Congress's 1st Lok Sabha candidates list  Saam TV
देश विदेश

Lok Sabha Election 2024: काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर; राहुल गांधी कुठून निवडणूक लढवणार?

Congress Lok Sabha candidate list: सूत्रांची माहितीनुसार, काँग्रेसने देखील आपल्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी तयार केली असून आज शुक्रवारी ती जाहीर होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

Congress's 1st Lok Sabha candidates list

लोकसभा 2024 निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जागावाटपावरून राजकीय पक्षांमध्ये खलबंत सुरू आहे. भाजपने यापूर्वीच लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतून अनेक दिग्गजांची नावे आहेत. दरम्यान, काँग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी केव्हा जाहीर करणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांची माहितीनुसार, काँग्रेसने देखील आपल्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी तयार केली असून आज शुक्रवारी ती जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी (ता. ७) दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, निवडणूक समितीतील अनेक नेते, प्रभारी उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

त्याचबरोबर बैठकीत संबंधित राज्यांमधील वरिष्ठ नेत्यांची देखील उपस्थिती होती. खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या CEC बैठकीत ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण ६० लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. यापैकी ४० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने (CEC) गुरुवारी छत्तीसगड, केरळ आणि इतर अनेक राज्यांमधील सुमारे ४० जागांसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिल्याची माहिती आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

सीईसी बैठकीनंतर काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मीडियाला सांगितले की, पक्षाने केरळ, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि लक्षद्वीपमधील जागा निश्चित केल्या आहेत. त्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाईल.

बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस आणि छत्तीसगडचे प्रभारी सचिन पायलट यांनी पत्रकारांना सांगितले की, बैठकीत चांगली चर्चा झाली. ज्या राज्यांसाठी सीईसीची बैठक झाली, त्या प्रत्येक जागेवर चर्चा झाली. राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार का, असे विचारले असता पायलट म्हणाले की, जो निर्णय घेतला जाईल, त्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून दिली जाईल.

दरम्यान, भाजपने पहिल्या यादीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांची तिकिटे रद्द केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणत्या दिग्गज नेत्यांची नावे समाविष्ट होणार आणि कोणत्या नेत्यांची तिकिटे कापली जाऊ शकतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT