''साहेबांच जगच वेगळं आहे''; सेंट्रल व्हिस्टाला अचानक भेटीबाबत कॉंग्रेसची मोदींवर टीका Saam Tv News
देश विदेश

''साहेबांच जगच वेगळं आहे''; सेंट्रल व्हिस्टाला अचानक भेटीबाबत कॉंग्रेसची मोदींवर टीका

मोदींना अमेरिकेत फोटोशूट करायला मिळाले नाही म्हणून सेंट्रल व्हिस्टाजवळ फोटोशूट केले अशी खोचक टीका कॉंग्रेसने केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच अमेरिका दौऱ्यावरुन भारतात परतले आहेत. भारतात परतल्यानंतर त्यांनी लगेचच दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पाला अचानकपणे भेट दिल्याचं बोलंल जातंय. कुठलीही पुर्वकल्पना न देता रात्री ८ वाजून ४५ मिनीटांनी पंतप्रधनांनी अचानक या ठिकाणी येऊन निर्माण कार्याची पाहणी केली असं बोललं जातंय. बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करत असतानाचे त्यांचे काही फोटोजही व्हायरल झाले आहे. यावरच आता कॉंग्रेसनं टीका केली आहे. मोदींना अमेरिकेत फोटोशूट करायला मिळाले नाही म्हणून सेंट्रल व्हिस्टाजवळ फोटोशूट केले अशी खोचक टीका कॉंग्रेसने केली आहे. (Congress criticizes Modi over sudden visit to Central Vista)

हे देखील पहा -

राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांना पंतप्रधानांच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टला अचानक दिलेल्या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं की, ''अमेरिकेत स्वागत नाही झालं तर, दिल्ली विमानतळावर स्वागत करुन घेतलं, व्हाईट हाऊसमध्ये फोटोशूट नाही झालं तर सेंट्रल व्हिस्टामध्येच काम चालवून घेतलं, साहेबांच जगच वेगळं आहे.'' अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

पंतप्रधानांच्या या भेटीबाबत भाजपने मोदींचे तोंड भरुन कौतुक केले आहे. महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदींनी अचानक दिलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या भेटीचे कौतुक केले असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं की, ''विकासाचा ध्यास हाच श्वास! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वारंवार हेच सिद्धच केले आहे. अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी सेंट्रल व्हिस्टाची पाहणी करण्यासाठी जाणे अचंबित करणारे आहे. त्यांची ही ऊर्जा आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणा देते, म्हणूनच मोदीजी आमचे मार्गदर्शक व आदर्श आहेत.''

दरम्यान सोशल मीडियावरही याबाबत चर्चा होताना दिसतेय. भाजप समर्थकांनी मोदींंवर स्तुतीसुमने उधळली आहे. मात्र अनेकांनी याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असं म्हणत मोदींवर टीका केली आहे. सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प टाटा कंपनीतर्फे तयार करण्यात येत असून ही भारताच्या संसदेची नवी इमारत असणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT