#HappyBirthdayLataDidi लता दीदींच्या ९२ व्या वाढदिवशी जाणून घ्या 'या' गोष्टी...

मेरी आवाज़ ही, पहचान है...गर याद रहे... लतादीदींचं हे सदाबहार गाणं ऐकलं तर त्यांच्या आवाजातील गोडवा आपलं मन मंत्रमुग्ध करतो.
#HappyBirthdayLataDidi लता दीदींच्या ९२ व्या वाढदिवशी जाणून घ्या 'या' गोष्टी...
#HappyBirthdayLataDidi लता दीदींच्या ९२ व्या वाढदिवशी जाणून घ्या 'या' गोष्टी...Saam Tv News
Published On

मेरी आवाज़ ही, पहचान है...गर याद रहे... लतादीदींचं हे सदाबहार गाणं ऐकलं तर त्यांच्या आवाजातील गोडवा आपलं मन मंत्रमुग्ध करतो. गानसम्राज्ञी, भारताची कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar's 92nd Birthday) अर्थात लतादीदींचा आज ९२ वा वाढदिवस. त्यांची आतापर्यंतची एकुणच कारकीर्द पाहता केवळ एका बातमीमध्ये ती सांगणं शक्य नाही, मात्र त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी नक्कीच माहित असायला हव्यात. त्यांच्या भव्य कारकीर्दीचा घेतलेला हा सुक्ष्म आढावा. (#HappyBirthdayLataDidi Know these things on Lata Didi's 92nd birthday ...)

हे देखील पहा -

लतादीदींचा (Lata didi) जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हेदेखील प्रसिद्ध संगितकार होते. त्यांचा वारसा त्यांच्या मुलींनी चालवला. आपल्या सुमधुर कोकिळेसारख्या आवाजामुळे लतादीदी जगविख्यात झाल्या. लता दीदींनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली त्यामुळे बॉलिवुडवर (Bollywood Singer Lata Mangeshkar) त्यांनी राज्य केलं. स्वातंत्र्यपूर्व काळापासून गाणी गाणाऱ्या लतादीदींचे आजही पाकिस्तान आणि बांगलादेशात चाहते आहेतच याशिवाय जगभरात त्यांना ओळखले जाते. त्यांनी २० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. वयोमानामुळे त्यांनी आता सार्वजनिक कार्यक्रमात गाणे बंद केल आहे.

लतादीदींच्या गाण्यानं जेव्हा नेहरु रडले होते

ए मेरे वतन के लोगो हे कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं एक हिंदी देशभक्तीपर गीत १९६२ च्या चिनी आक्रमणादरम्यान शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना हे गाणं समर्पित करण्यात आलं होतं. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Naharu ji) यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लता मंगेशकर यांनी हे गाणं सादर केलं. असं म्हटलं जातं की, हे गाणं ऐकल्यानंतर नेहरूंचेही डोळे भरून आले होते.

३३ व्या वर्षी विषप्रयोग

दीदींना वयाच्या ३३ व्या वर्षी जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. तीन महिन्यांपर्यत त्या उपचार घेत होत्या. दीदींनीच एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली होती. एक दिवस अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगितलं. लता मंगेशकर यांना अन्नातून विष देण्यात आले होते. ज्यादिवशी दीदींना खाण्यातून त्रास जाणवायला लागला त्याच दिवशी त्यांचा कूक गायब झाला होता. तेव्हापासून दीदींच्या छोटी बहिण उषा मंगेशकर यांनी स्वयंपाक घराची जबाबदारी घेतली होती. दीदींना त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी तीन महिने लागले होते. तो काळ त्यांच्यासाठी मोठा कष्टदायक होता.

'या' कारणामुळे बहीण आशाताईंसोबत तोडलं होतं नातं

लतादीदींचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी आशाताईंनी (Asha Bhosle) वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केलं होतं. लग्नाच्या वेळी गणपतराव त्यावेळी ३१ वर्षांचे होते. हे लतादीदींना अजिबात आवडलं नाही. आशा भोसले यांच्या या निर्णयामुळे लता खूप नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या लग्नाला मान्यता दिली नव्हती. या कारणामुळे लतादीदी आशाताईंशी अनेक वर्ष बोलल्या नाहीत. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा लतादीदी आणि आशाताई एकमेकांसोबत बोलायला लागल्या आणि आता त्यांच नातं स्थिर आहे. आशा भोसले यांनीही भारतीय आणि जागतिक संगीत क्षितीजावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

#HappyBirthdayLataDidi लता दीदींच्या ९२ व्या वाढदिवशी जाणून घ्या 'या' गोष्टी...
लाकडी कलाकुसरीतून उदर निर्वाहासाठी धडपड; वृद्ध कलावंताची अखंड साधना

पुरस्करांची कारकीर्द

लता दीदींना त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. संगीत क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठी भारतरत्न (Bharatratna) या सर्वोच्च नागरी पुरस्काराने २००१ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना आतापर्यंत ३ नॅशनल अवार्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com