Political News Saam tv
देश विदेश

Political News: मोदी सरकारचा मोठा निर्णय; नेहरू मेमोरियल म्युझियमचं नाव बदललं, काँग्रेस आक्रमक

देशाच्या राजधानी नवी दिल्लीत असलेलं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

New Delhi: देशाच्या राजधानी नवी दिल्लीत असलेलं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव बदलण्यात आलं आहे. या म्युझियमचं नाव आता 'प्राइम मिनिस्टर म्युझियम लायब्ररी' असं करण्यात आलं आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या एका विशेष बैठकीत या म्युझियमचं नाव बदण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष बैठक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राजनाथ सिंह हे या सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये तीन मूर्ती परिसरात भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित एक संग्रहालय करण्याचा विचार व्यक्त केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विचाराला अनुसरून बैठकीत २५ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आलेल्या निर्णयाला १६२ व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.

म्युझियमचं नाव का बदलण्यात आलं?

दरम्यान, या म्युझियमच्या समितीच्या सदस्यांनी संस्थेचं नाव सध्याच्या वर्तमान काळाला साजेशं हवं असा विचार मांडला होता. तसेच स्वतंत्र्य भारतात प्रत्येक पंतप्रधानांचं योगदान म्युझियममध्ये दिसून येईल. म्युझियम हे नेहरू संग्रहालय भवनापासून सुरू होते.

काँग्रेस आक्रमक

या निर्णयानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश ट्विट करत म्हणाले की, गेल्या ५९ वर्षांहून अधिक काळापासून हे म्युझियम आणि ग्रंथालयात एक जागतिक बौद्धिक ऐतिहासिक स्थळ आणि पुस्तकांचं घर आहे. आता या स्थळाला पंतप्रधान म्युझियम आणि सोसायटी म्हटलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्राचे शिल्पकार यांच्या नाव आणि इतिहासाला विद्रूप करणे, कमी लेखणे आणि नष्ट करण्याचं काम करत आहे. एक लहान व्यक्तिमत्व व्यक्ती स्वत:ला स्वयंघोषित विश्वगुरू म्हणत हिंडत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

Maharashtra News Live Update: मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा?

LPG गॅस सबसिडीच्या नियमात मोठा बदल; अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून ४ वर,उज्ज्वला लाभार्थ्यांना झटका

SCROLL FOR NEXT