Manipur Violence : मणिपूरमधील परिस्थिती चिघळली; हिंसक जमावाने केंद्रीय मंत्र्याचं घर पेटवलं, पाहा भीषण VIDEO

Mob Torched Union Minister Home : केंद्रीय मत्र्यांच्या घराव्यतिरिक्त आणखी दोन घरेही हल्लेखोरांनी पेटवली.
Manipur Violence
Manipur Violence Saam TV

Manipur Violence : मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचार काही केल्या थांबताना दिसत नाही. संतप्त नागरिकांनी काल केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांचं घरच पेटवून दिलं आहे. या घटनेतून मणिपूरमधील नागरिकांच्या संतापाची कल्पना केली जाऊ शकते.

मणिपूरमधील इंफाळमध्ये काल 15 जून रात्री जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली. मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवानी जमावाने घराला आग लावली त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. केंद्रीय मत्र्यांच्या घराव्यतिरिक्त आणखी दोन घरेही हल्लेखोरांनी पेटवली. (Latest News Update)

महिला मंत्र्याचं घरंही पेटवलं

दोन दिवस आधी 14 जून रोजी काही हल्लेखोरांनी इंफाळच्या लामफेलमधील महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत घरालाही आग लावली होती. यावरुन मणिपूरमधील स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याचं दिसून येत आहे.

गोळीबारात 9 जण ठार

13 जून रोजी हिसांचारादरम्यान अचानक झालेल्या गोळीबारात 9 जण ठार झाले होते. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांनाही समाजकटंकानी आग लावली. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंग येथेही अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Manipur Violence
Manipur Clashes: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 9 जणांचा मृत्यू; 10 जखमी

मणिपूरमधील सध्याची परिस्थिती

मणिपूरमधील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण आहे. राज्यातील 16 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. तर इंटरनेट सेवाही बंद आहेत. या सर्व परिस्थितीमुळे लोकांना रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com