Cobalt Mine Collapse Latest News Saam TV marathi News
देश विदेश

Mine Collapse : पूल तुटला, आरडाओरडा अन् किंकाळ्या, ४० जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

काँगोच्या लुआलाबा प्रांतातील कलांडो खाणीत पूल कोसळल्याने भूस्खलन होऊन ४० पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतरही खाणीत बेकायदेशीर काम सुरू होते. धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

  • खाणीत पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आणि ४० हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला.

  • मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा इशारा देऊनही बेकायदेशीर खाणकाम सुरू होते.

  • सैनिकांच्या हवाई गोळीबारामुळे कामगारांनी पुलावर गर्दी केली.

  • घटनेनंतर बचावपथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

Cobalt Mine Collapse Latest News : काँगोमध्ये तांबे आणि कोबाल्ट खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. खाणीतील पूल कोसळल्याने खाणीत भूस्खलन झाले अन् ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण या खाणीतील ढिगाऱ्याखाली दबले गेले. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या इशाऱ्यानंतरही खाणीत बेकायदेशीर काम सुरू होते. एकाचवेळी अनेक कामगार पुलावर होते, त्यावेळी अचानक पूल कोसळला अन् एकच हाहाकार उडाला. सगळीकडे आरडाओरड अन् किंकाळ्याने खाण हादरून गेली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल.

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कांगोमधील लुआलाबा प्रांतातील मुलोंडो येथील कलांडो खाणीतील पूल शनिवारी अचानक कोसळला. लुआलाबाचे गृहमंत्री रॉय कौम्बा मायोंडे म्हणाले की, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या धोक्याबद्दल वारंवार इशारा देण्यात आला होता. सक्त मनाईनंतरही खाणीमध्ये कामगार कामासाठी गेले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैनिकांनी केलेल्या हवाई गोळीबारामुळे खाण कामगारांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि मोठ्या संख्येने लोक पुलावर चढले. त्यामुळे पूल अचानक कोसळला अन् दुर्घटना घडली.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दुर्घटनेत ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी भयानक होती की पूल कोसळला त्यावेळी कामगार अतिशय उंचीवरून एकमेंकावर पडले. मृतांचा ढिगारा लागला होता. अनेकजण जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोबाल्ट हा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आणि इतर तंत्रज्ञानात वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये एक प्रमुख घटक आहे. काँगो हा जगातील सर्वात मोठा कोबाल्ट उत्पादक देश आहे. देशातील कोबाल्ट उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादन चिनी कंपन्या नियंत्रित करतात. या ठिकाणी बालमजुरी , असुरक्षित कामाच्या परिस्थिती आणि भ्रष्टाचाराचे आरोप अनेक वर्षांपासून केले जात आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast Update : बहि‍णीकडे जातो म्हणून निघाला अन् दिल्लीत पोहचला, बॉम्बस्फोटावेळी मशिदीत मुक्काम, अकोल्यात येताच....

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिलं नाही- राज ठाकरेंची पोस्ट

पुण्यात अजित पवार गटाला जबरदस्त धक्का; स्थानिक नेतृत्वाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र करणार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पेन्शधारकांना महागाई भत्ता मिळणार नाही? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Pune Accident: पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, धावत्या ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं

SCROLL FOR NEXT