lpg gas cylinder 
देश विदेश

माेठा दिलासा; गॅस सिलेंडरची किंमत १०२ रुपयांनी उतरली

ही किंमत २०१२-१३ सर्वाधिक (दुसऱ्या क्रमांकाची) मानली जात हाेती.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी जानेवारी २०२२ पासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (commercial LPG cylinder) किमती १०२ रुपये ५० पैशांनी कमी केली आहे. हा निर्णय नवीन वर्षात ग्राहकांना दिलासा देणार ठरला आहे. नव्या निर्णयाची अमंलबजावणीस प्रारंभ झाला असून दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता एक हजार ९९८ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. याबाबत ANI ने दुजाराे दिला आहे. नवा निर्णय रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स तसेच खाद्य पदार्थ विक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा देणारा ठरणार आहे. LPG Cylinder rate is revised monthly for all the states and union territories in India

गेल्या महिन्यात एक डिसेंबरला १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या (lpg cylinder) किमतीत शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली हाेती. दिल्लीत (delhi) या सिलिंडरची किंमत दाेन हजार १०१ रुपयांवर गेली हाेती. ही किंमत २०१२-१३ सर्वाधिक (दुसऱ्या क्रमांकाची) मानली जात हाेती. त्यावेळी दाेन हजार २०० रुपयांना प्रति सिलेंडर मिळत हाेता.

दरम्यान १४.२ किलो, पाच किलो, दहा किलो कंपोझिट किंवा पाच किलोग्रॅम वजनाच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणतीही बदल झालेला नाही. यापूर्वी एक नोव्हेंबर रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती २६६ रुपयांनी वाढल्या होत्या. त्यानूसार दाेन हजार ५० रुपयांपर्यंत पैसे आकारले जात हाेते.

नवीन दर कपातीनंतर आता १९ किलो सिलेंडरची किंमत दिल्लीत २१०१ रुपयांच्या एेवजी १९८८.५० पैसे इतकी असेल. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एलपीजी सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यास बदलले जातात. यापूर्वी एक ऑक्टोबरला १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत ४३ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सहा ऑक्टोबरला अडीच रुपयांनी घट करण्यात आली हाेती. सप्टेंबर महिन्यात सिलेंडरच्या किंमती 75 रुपयांनी वाढल्या होत्या.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Katrina Kaif : निखळ हास्य अन् चेहऱ्यावर ग्लो; आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच दिसली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी घेणार माघार

Veen Doghantali Hi Tutena : समरसोबतची मैत्री तुटली, आनंदचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वानंदी दोन जिवलग मित्रांना कसं जवळ आणणार? | VIDEO

Viral Video: मोपा विमानतळावर रानगव्याची एन्ट्री, कर्मचाऱ्यांसह प्रवासी घाबरून पळू लागले; VIDEO व्हायरल

Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?

SCROLL FOR NEXT