स्टँडअप कॉमेडीयन आणि मिमिक्री आर्टीस्ट श्याम (Comedian Shyam Rangeela) रंगीला सतत काही ना काही हटके करुन चर्चेत असतो. यंदा त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक बॅनर शेयर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. या बॅनरची खासियत म्हणजे या बॅनरवर मोदींचा फोटो एका कोपऱ्यात अतिशय छोटा ठेवला आहे तर, स्वतःचा फोटो मोठा ठेवला आहे. हाच बॅनर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून विविध प्रतिक्रीया येतायत. (Comedian Shyam Rangeela criticize to Modi for keeping his photo bigger than olympic medalist)
हे देखील पहा -
टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic 2020) मध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा मोदी सरकारकडून सन्मान करण्यात आला होता. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात होता. मात्र या सोहळ्यात मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे (Banner) मोदींवर टीका करण्यात आली होती. त्याचं कारण म्हणजे त्या बॅनरवर मोदींचा फोटो खूपच मोठा होता, त्या तुलनेत पदक विजेत्या खेळाडूंचे फोटोज् खूपच छोटे होते. या खेळाडूंचे फोटो लांबून नीट दिसतही नव्हते मात्र मोदींचा मोठा फोटो बरोबर दिसत होता. याच मुद्दयावरुन कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी मोदींवर टीका केली होती.
भारतीय यवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, “पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,” असा खोचक टोला लगावला होता. तर, बॉक्सर विजेंद्र सिंग यानेही या बॅनरवर टीका करत ट्विट केले की, ''Everything is PR PR is everything'' म्हणजे सगळं काही जनसंपर्क आहे, जनसंपर्क सगळं काही आहे, असा टोला लगावला होता. आता कॉमेडियन श्याम रंगीलाने मोदींपेक्षा स्वतःचा फोटो मोठा ठेवत स्वतःच्या हटके अंदाजात मोदींना कोपरखळी मारली आहे. ''टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिल्याबद्दल आणि भारताच्या खेळाडूंचा सन्मान केल्याबद्दल मोदीजींचे हार्दीक आभार'' अशा आशयाची ही पोस्ट आहे.
श्याम रंगीला हा राजस्थानचा असून तो यूट्यूबरही आहे. दोन वर्षांपुर्वी जेव्हा अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधानांची तथाकथित अराजकीय मुलाखत घेलती होती तेव्हा त्या मुलाखतीवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र त्यानंतर लगेचच २८ एप्रिल २०१८ रोजी श्याम रंगीलाने या मुलाखतीचा मिमिक्री व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासून श्याम रंगीला प्रकाश झोतात आला आहे. तो मोदींची उत्तम मिमिक्री करतो, शिवाय राहुल गांधींचीही मिमिक्री करतो. यूट्यूबवर त्याचे सात लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.