नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) २०२० या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंचे मायदेशी परतल्यावर जोरदार स्वागत करण्यात आले. नवी दिल्लीतील जोरदार वेलकम नंतर दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र मंचावर मागच्या बाजूला लावलेल्या बॅनरमध्ये या खेळाडूंचे फोटोस् फारच छोट्या आकाराचे होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो खेळाडूंच्या फोटोपेक्षा बराच मोठा होता. या खेळाडूंचे फोटोस् तर लांबून दिसतही नव्हते, त्यामुळे मोदींवर अनेकांनी टीका केली आहे. (PM modi criticized by congress because of big photo on banner)
हे देखील पहा -
या कार्यक्रमात सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह टोक्योहून मायदेशी परतलेल्या भारतीय ऑलिम्पिक पथक होते. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. मात्र बॅनरवरील खेळाडूंच्या छोट्या फोटोमुळे अनेकांनी टीका केली आहे.
भारतीय यवक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, “पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,” असा खोचक टोला लगावला आहे. तसेच दुसऱ्या एका अन्य ट्विटमध्ये ''खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत न पहले कभी देखी है न सुनी है.. आखिर Modi ji की दिक्कत क्या है?'' असं म्हणत मोदींवर निशाणा साधलाय.
बॉक्सर विजेंद्र सिंग यानेही या बॅनरवर टीका करत ट्विट केले की, ''Everything is PR PR is everything'' म्हणजे सगळं काही जनसंपर्क आहे, जनसंपर्क सगळं काही आहे, असा टोला लगावला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.