Colombia Helicopter Crash Saam TV
देश विदेश

Helicopter Crash : कोलंबियात मोठी दुर्घटना! लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; ४ जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Colombia Helicopter Crash : कोलंबियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबियात लष्करी जवानांचे हेलिकॉफ्टर कोसळले आहे.

Satish Daud

Colombia Helicopter Crash : कोलंबियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबियात लष्करी जवानांचे हेलिकॉफ्टर कोसळले आहे. या भीषण अपघातात चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर कोसळतानाची थरारक घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

कोलंबियाच्या पश्चिमेकडील क्विब्डो शहरात अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्करी हेलिकॉप्टर पुरवठा ऑपरेशन करत होते. मात्र, उंचावर असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते खाली कोसळले.

सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी ते नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसून आले. कोलंबियाचे राष्ट्राअध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी ट्विटरवर या घटनेची पुष्टी केली आणि अपघाताच्या ठिकाणी आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्याचे सांगितले.

"काही मिनिटांपूर्वी, पुरवठा कार्ये पार पाडत असताना क्विब्डो येथे लष्कराचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले. मी अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तातडीने या भागात जाण्याचे आदेश दिले आहेत आणि जे घडले त्यामागील कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट आणि दोन क्रू मेंबर्स होते. यातील दोन जणांनी हेलिकॉप्टर कोसळण्यापूर्वी उड्या मारल्या असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान, कोलंबियामध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT