Accident Video  Saam TV
देश विदेश

Accident CCTV Footage: बाईकची घोड्याला जोरदार धडक! काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आला समोर

Accident Video : अपघातात घोडा आणि बाईकवरील व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : सीसीटीव्हीमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे बरेच व्हिडीयो समोर येत असतात. यातील काही अपघात इतके भीषण असतात की पाहणेही शक्य होत नाहीत. असाच एक अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. बाईक आणि घोडा यांच्या धडकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घोडा आणि बाईकवरील व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील देवास येथील ही घटना आहे. अपघाताची घटना मध्यरात्रीची आहे. रात्र असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळही फार दिसत नाही. यावेळी घोड्यावर बसलेला एक व्यक्ती रस्ता ओलांडताना दिसत आहे. रस्त्यावरुन कोणती गाडी येत नाही ना याची काळजी घेताना घोडस्वार दिसत आहे. (Viral Video) 

रस्ता ओलांडण्यासाठी गाडीची वाट पाहत आहे. तिथून गाडी पुढे जाताच, घोडेस्वार पुन्हा रस्ता ओलांडू लागतो, तेवढ्यात रस्त्यावरुन एक वेगवान बाईक येते आणि घोड्याला जोरात धडकते. यानंतर घडलेला प्रकार मन व्यथित करणारा आहे. (Latest Marathi News)

बाईक आणि घोड्याच्या जोरदार धडकेनंतर बाईक रस्त्यांनी फरफटत दूरवर झाते. या धडकेत बाईक चालक आणि घोडेस्वारही रस्त्याच्या मधोमध पडतात. घोडाही धडकेनंतर रस्त्यावर पडतो आणि काही क्षणात घोडा उभा राहतो. रस्त्याच्या मधोमध हा सगळा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाईक चालवणारी व्यक्ती आणि घोडेस्वार या अपघातात जखमी झाले आहेत. तर घोड्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. अपघातात हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT