Weather Update Saam tv
देश विदेश

Weather News: दिल्लीपासून उत्तर प्रदेश-बिहारपर्यंत थंडीची लाट; मध्य प्रदेश-महाराष्ट्रात पावसाची शक्यता

जाणून घ्या देशभरातील हवामानाची स्थिती

वृत्तसंस्था

Weather Update : डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशात सर्वत्र थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. पर्वतांवर बर्फवृष्टी सुरू असतानाच दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढत आहे. मैदानी भागात थंडीचा त्रास पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे तापमानात झपाट्याने घट होत आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीला तापमानात (Weather Update)कमालीची घट झाली आहे. त्यामुळे तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआर ते यूपी-बिहारपर्यंत किमान तापमानात सुमारे 5 अंशांची घसरण झाली आहे. त्यामुळे दिवसभर थंडीचा कडाका जाणवत आहे.

राजधानी दिल्लीशिवाय उत्तर प्रदेश-बिहारमध्येही थंडीचा प्रभाव दिसून येत आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरच्या (Delhi) अनेक ठिकाणी आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील. रात्री तापमानात लक्षणीय घट होणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या काळात थंडीत आणखी वाढ होणार असल्याचे बोललेले जात आहे. वाढलेल्या थंडीमुळे नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत.

मध्यप्रदेश-महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशातील अनेक भागात थंडीची लाटही दिसून येत आहे. पाऊस आणि थंडीची लाट यामुळे तापमानात मोठी घसरण होणार आहे. येत्या आठवडाभरात लोकांना दिवसा शेकोटीचा सहारा घ्यावा लागणार आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्येही पाऊस सुरू

दक्षिणेकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात वाऱ्याचा दाब दिसून येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दक्षिण भारतातील अनेक राज्ये, तमिळनाडू आणि अंदमान-निकोबारमध्ये पर्जन्य गटाच्या काही भागात येत्या 24 तासांत पावसाची शक्यता आहे. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT