“Symbolic representation of the viral ‘Cockroach Party’ movement gaining traction among youth across India and Pakistan.” saam tv
देश विदेश

आणखी एका 'कॉकरोच पार्टी'ची स्थापना, सत्ताधाऱ्यांचे टेंशन वाढलं; राजकीय वर्तुळात खळबळ

Cockroach Party Viral Trend In India And Pakistan: भारतामध्ये सुरू झालेली ‘कॉकरोच पार्टी’ ही सोशल मीडिया चळवळ आता पाकिस्तानपर्यंत पोहोचली आहे. तरुणांच्या बेरोजगारी, शिक्षण आणि व्यवस्थेविरोधातील नाराजीला या उपरोधिक आंदोलनातून आवाज मिळत असून ही ट्रेंडिंग राजकीय घडामोड चर्चेत आली आहे.

Omkar Sonawane

भारतात सुरू झालेली ऑनलाइन राजकीय चळवळ आता शेजारील देशातील तरुणांमध्येही चर्चेचा विषय बनली आहे. पाकिस्तानात याच धर्तीवर कॉकरोच अवामी पार्टी (CAP) आणि कॉकरोच अवामी लीग (CAL) सारखी अनेक सोशल मीडिया पेजेस समोर आली आहेत.

खरंतर भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांची झुरळासोबत तुलना केल्याने युवक चांगलेच संतापले आणि देशात तयार झाली कॉकरोच पार्टी. अवघ्या दोन दिवसात कोट्यवधी फॉलोवर्स झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे माजी नेते अभिजित दिपके यांनी १६ मे रोजी सोशल मीडियावर "कॉकरोच जनता पार्टी" मोहीम सुरू केली. त्यांनी उपरोधिकपणे स्वतःला "कॉकरोच" म्हणवून घेत ही चळवळ बेरोजगार आणि व्यवस्थेवर नाराज असलेल्या तरुणांचा आवाज असल्याचे म्हटले.

फॉलोअर्स कोट्यवधींच्या घरात

अवघ्या काही दिवसांतच या पार्टीचे इंस्टाग्राम अकाउंट झपाट्याने व्हायरल झाले आणि त्याचे फॉलोअर्स कोट्यवधींच्या घरात पोहोचले. या पार्टीने स्वतःला "आळशी आणि बेरोजगार तरुणांचा" आवाज म्हणवून घेत शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा, परीक्षा पद्धतीतील सुधारणा यांसारखे मुद्दे उपस्थित केले. उपरोधाच्या आणि मीम्सच्या माध्यमातून ही चळवळ तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय झाली.

भारतात याची लोकप्रियता वाढल्यानंतर पाकिस्तानातही अशीच अकाउंट्स समोर येऊ लागली. "Cockroach Awami Party" नावाच्या एका इंस्टाग्राम पेजने आपण भारतीय चळवळीपासून प्रेरित असल्याचे उघडपणे मान्य केले. त्यांच्या बायोमध्ये लिहिले आहे, "होय कॉपी केले आहे, पण त्याने काय फरक पडतो. मुद्दा तोच आहे. असे त्याने लिहिले आहे.

पाकिस्तानी "कॉकरोच" पेजेस स्वतःला तेथील 'जेन-झी' (Gen-Z) पिढीचा आवाज सांगत आहेत. पाकिस्तानच्या पारंपारिक राजकारणाला एक पर्याय म्हणून समोर येण्याचा आपला हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या अनेक पोस्ट्समध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI), पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) यांसारख्या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांवर निशाणा साधण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मावळमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

Top 10 Actress: टॉप १० अभिनेत्रींची यादी जाहीर; भारताची नंबर १ अभिनेत्री कोण जाणून घ्या

अभिनेत्री ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; पीडित कुटुंबाने केली मोठी मागणी

Weather Update: मुंबई, पुण्याला मान्सून पूर्व पावसानं झोडपलं, कडाक्याच्या उन्हापासून दिलासा; पण विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट

पार्लरला जाणं टाळा, या 5 सोप्या पद्धतीने घरच्या घरी करा 'नॅचरल हेअर स्पा'

SCROLL FOR NEXT