tamil nadu news  Saam tv
देश विदेश

तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग; CM विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

tamil nadu political news : तमिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री विजय यांनी आज स्टॅलिन यांची भेट घेतली.

Vishal Gangurde

शपथविधीनंतर तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग

मुख्यमंत्री विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट

मुख्यमंत्री विजय आणि स्टॅलिन यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

थलपती विजय यांनी काल राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री विजय यांनी आज डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भेटीनंतर दोघांमध्ये काय चर्चा झाली, याची राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये विजय काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहेत. त्यांनी स्टॅलिन यांना हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर डीएमके प्रमुख स्टॅलिन यांनीही हात जोडून नमस्कार केला.

विजय यांनी काँग्रेस आणि इतर पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं आहे. तमिळनाडूच्या निकालानंतर ४ दिवस विजय यांना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यात गेले. बहुमताचा आकडा गाठल्यानंतर काल विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री झाल्यावर विजय यांनी पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांना राज्याची आर्थिक स्थितीसाठी मागील सरकारला दोष न देण्याचा सल्ला दिला. स्टॅलिन यांनी पुढे म्हटलं की, 'जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण करावीत. तर सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटलं की, 'मी मुख्यमंत्रि‍पदावर असताना ज्या घोषणांवर स्वाक्षरी केली, त्याचे स्वागत करतो'.

तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी १० लाख कोटींच्या कर्जावरून स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला होता. 'तमिळनाडूचे कर्ज नियमानुसार आहे. फेब्रुवारीच्या बजेटमध्ये राज्याची आर्थिक स्थिती स्पष्ट केली. तुम्हाला याविषयी माहिती नव्हती का? अशी प्रतिक्रिया स्टॅलिन यांनी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कधी सुरु होणार? उड्डाणपुलाची काय आहेत वैशिष्ट्ये?

Pune Crime: पुणे हादरले! महापालिका कर्मचाऱ्याची घरासमोर हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: परभणीच्या जिंतूर तालुक्यात पाणी टंचाई

Fort In Dhule : शिखरावरून दिसते खानदेशाचे विहंगम दृश्य, धुळे येथे लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Explainer: एका वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका! पीएम मोदींनी असं का केलं आवाहन, गोल्डमुळे अर्थव्यवस्थेचं कसं होतंय नुकसान?

SCROLL FOR NEXT