Bhagvant Mann Decision on Punjab Ration  SaamTvNews
देश विदेश

Punjab: 'AAP' सरकारचा मोठा निर्णय! आता घरोघरी पोहोचणार रेशन, मिळणार 'डोअर स्टेप डिलिव्हरी'

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, पंजाबमध्ये आता सरकार घरोघरी रेशन पोहोचवणार आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पंजाबमध्ये 'आप' सरकारने सत्तेत येताच मोठमोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन नंबर, तसेच माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये घट असे धधाडीचे निर्णय घेतले. यापाठोपाठ आता दिल्लीनंतर, AAP ने पंजाबमधील (Punjab) लोकांसाठी रेशनचे घरोघरी वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) म्हणाले, “आमचे अधिकारी तुम्हाला कॉल करतील आणि माहिती घेऊन तुम्हाला तुमचे रेशन वाटप करतील. संदर्भातील विभागाचे अधिकारीच हे काम करतील.." (Bhagwant Maan New Decision For Punjab)

यासंदर्भात मुख्यमंत्री मान यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे (Video Call) म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आजही गोरगरिबांना रेशन (Ration) घेण्यासाठी रेशन दुकानांवर लांबच लांब रांगा लावाव्या लागतात आणि ही अत्यंत खेदाची बाब आहे. तर संपूर्ण जग इतके डिजिटल झाले आहे की, फोन कॉलवर ऑर्डर केलेली कोणतीही गोष्ट थेट तुमच्या घरी येते.

यासोबतच मान म्हणाले की, आता राज्यातील जनतेला ही योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. रेशनच्या दुकानाजवळ राहणारे ते तेथूनच घेऊ शकतात. मात्र, जे लोक डुअरस्टेप डिलिव्हरी हा पर्याय निवडतात त्यांनी याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या डिलिव्हरीच्या ठिकाणी किती वाजता पोहोचायचे आहे याची माहिती द्यावी लागेल. जनतेने दिलेल्या वेळेवर स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे स्वच्छ रेशन दिले जाईल.”

पुढे मुख्यमंत्री मान म्हणाले की, "आमच्या सरकारने लोकांचे जीवन सोप्पे करण्याचा निर्णय घेतला आहे. जे की या पूर्वीच्या सरकारांनी करायला हवे होते. मूलभूत गरजांवर काम करून लवकरच ही योजना पूर्णत: सुरू केली जाईल, असेही यावेळी ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT