Heavy Rains Wreak Havoc in J&K Saam TV News
देश विदेश

जम्मू काश्मीरमध्ये आभाळ फाटलं! १० घरं गेली वाहून, चौघांचा मृत्यू; राष्ट्रीय महामार्ग बंद

Heavy Rains Wreak Havoc in J&K: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात अचानक ढगफुटीमुळे पूर. भालेसा भागात १० घरांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

Bhagyashree Kamble

  • जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात अचानक ढगफुटीमुळे पूर

  • भालेसा भागात १० घरांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

  • केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी परिस्थितीचा आढावा घेतला

  • भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू

जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. मंगळवारी केंद्रशासित प्रदेशातील दोडा जिल्ह्यात अचानक ढगफुटी झाल्यानं पूर आला. त्यामुळे १० घरांचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण चार जणांचा मृत्यू झाला. पुरात घर कोसळल्यानं दोघांचा तर, पुरात वाहून गेल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे. परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दुपारी एक्सवर पोस्ट शेअर केली. 'डोडा येथील डीसी हरविंदर सिंह यांच्याशी नुकतेच बोलणे झाले आहे. भालेसा येथील चारवा भागात अचानक पूर आला. आतापर्यंत या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आढावा बैठक घेतली. त्यांनी या आढावा बैठकीत प्रशासनाला सुचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी ट्विटर पोस्ट केली आहे. 'जम्मू प्रांतातील अनेक भागात परिस्थिती खूप गंभीर आहे. परिस्थितीचे निरिक्षण करण्यासाठी मी स्वत: जम्मूला जाईन. इतर गरजांसाठी उपायुक्तांना अतिरिक्त निधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत'.

उपायु्क्त हरविंदर सिंग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. विशेषत: चिनाब नदीच्या परिसरात. दोन ठिकाणांहून ढगफूटीचं वृत्त समोर आलं आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गोठ्यांचं नुकसान झालं आहे. खासगी आरोग्य केंद्राचेही नुकसान झालंय. तीन पादचारी पूल वाहून गेले आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे सुरू आहे'. या ढगफूटीमुळे झालेल्या नुकसानामुळे वैष्णो देवी यात्रा थांबवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT