Telangana chief minister K Chandrasekhar Rao
Telangana chief minister K Chandrasekhar Rao  saam tv
देश विदेश

Telangana : ढगफुटींमागे परदेशी षडयंत्र : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

साम न्यूज नेटवर्क

तेलंगणा : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (chief minister K Chandrasekhar Rao) यांनी आज (रविवार) भद्राद्री-कोथागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या पाहणी दाै-यात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री राव यांनी राज्यात पूरपरिस्थिती निर्माण करण्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान पुरामुळे (flood) बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत (help) आणि वीस किलो तांदूळ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. (K Chandrasekhar Rao News)

मुख्यमंत्र्यांनी भद्राचलम करकट्टाजवळ गोदावरी नदीचे (Godavari river) निरीक्षण केले आणि पूरग्रस्तांशी चर्चा केली. भद्राचलम पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी वसाहती बांधल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. पुनर्वसन केंद्र म्हणून आदर्श असलेल्या जिल्हा परिषद शाळेचीही त्यांनी पाहणी केली.

देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आम्ही हैदराबादमधील लोकांची नियुक्ती केली, लष्कराकडे मदत मागितली, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम्स आणि हेलिकॉप्टर होते आणि त्यामुळेच या संकट काळात जीवितहानी न करता मार्ग काढू शकलो असेही त्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बाेलताना नमूद केले.

Telangana chief minister K Chandrasekhar Rao

दरम्यान देशातील ढगफुटींमागे परदेशी राष्ट्रांचा हात असण्याची शक्यता आहे. खरंतर या अफवा देखील असू शकतात. गतवर्षी काश्मीर आणि नंतर उत्तराखंडमध्ये असेच उदाहरण दिसले होते. आता ते गोदावरी परिसराला लक्ष्य करत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. ते म्हणाले कोणत्याही परिस्थितीत पूरस्थिती हवामानातील बदलांमुळे उद्भवते आणि लोकांचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

मुख्यमंत्री राव यांनी अद्याप धोका टळलेला नाही. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना जुलैअखेरपर्यंत सावध राहण्याचे निर्देश दिले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस राहणार आहे. त्यामुळे पुनर्वसन केंद्रातील लोकांना त्यांच्या घरी परत पाठवण्याची घाई करू नका अशी सूचना त्यांनी स्थानिक अधिका-यांना केली. त्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बुर्गमपाडू येथून एतुरुनगरमला गेले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fungal Infection: वेळीच व्हा सावधान 'या' कारणामुळे होऊ शकतो फंगल इन्फेक्शनचा भयंकर त्रास

Benifits of Chia Seeds: चिया सिड्सचे सेवन महिलांसाठी ठरते अत्यंत फायदेशीर

Dombivali Crime News : पती- पत्नीच्या भांडणात गमावला जीव; डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांची हत्या

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: कुजलेला तांदूळ, लाकडी भुसा अन् ॲसिडचा वापर.. दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; ३ अटकेत

SCROLL FOR NEXT