Hariyana News SaamTv
देश विदेश

12th Student Suspended : युट्यूबवर पाहून बॉम्ब बनविला आणि थेट शिक्षकाच्या खुर्चीखाली केला विस्फोट, बारावीतल्या विद्यार्थ्यांचा कारनामा

Hariyana Crime News : तंत्रज्ञानाचा गैरवापर माणसाला किती घातक ठरू शकतो याचा प्रत्यय हरियाणा येथील घटनेतून आला आहे. या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांनी युट्यूबवर बघून बॉम्ब बनवल्याची घटना समोर आली आहे.

Saam Tv

भिवनी (हरियाणा) : हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीत शिकणाऱ्या 13 विद्यार्थांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विज्ञानाच्या शिक्षकाच्या खुर्चीखाली फटाक्यासारखा बॉम्ब ठेवला व रिमोटने त्याचा स्फोट केला. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली होती, या रागातून विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या स्फोटामुळे खुर्चीला मोठे छिद्र पडले. सुदैवाने शिक्षकाला कोणतीही दुखापत झाली नाही.

युट्यूबवरवरून शिकून बॉम्ब बनवला 

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या एका विद्यार्थ्याने शिक्षकांच्या खुर्चीखाली फटाक्यासारखा बॉम्ब ठेवला होता. वर्गातील आणखी एका विद्यार्थ्याने रिमोट कंट्रोलने ते उडवले. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत पोहोचून तपासणी करून कारवाई केली. युट्युबवरून स्फोटके कशी बनवायची हे विद्यार्थ्यांनी शिकल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा विचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र पालकांनी माफी मागितली आणि भविष्यात विद्यार्थी असे प्रकार करणार नाहीत, असे आश्वासन दिले. या घटनेनंतर शिक्षण विभागाने 13 विद्यार्थ्यांना एका आठवड्यासाठी निलंबित केले.

या घटनेत वर्गातील 15 पैकी 13 विद्यार्थिनींचा सहभाग असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) नरेश मेहता यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

युट्यूबच्या घातक सामग्रीवर अंकूश कोणाचा?

प्रत्त्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. युट्यूबवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे सर्व सामान्याना मोफत अनेक गोष्टींचे ज्ञान उपलब्ध होते. याचा उपयोग स्वतःमधील कौशल्य वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो, मात्र अशा अनेक गोष्टी युट्यूबवर उपलब्ध आहेत ज्या समाजासाठी घातक ठरू शकतात.

अशा व्हिडीओला लाखोंच्या संख्येत व्युव्ह देखील असतात. युट्यूबवर दाखवण्यात येणाऱ्या या घातक सामग्रीवर अंकूश असणे फार आवश्यक आहे. अन्यथा त्याचा गैरवापर केल्यास समाज हितासाठी ते घातक ठरू शकते. 

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT