ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीचे दिल्लीत आंदोलन
अभिजीत दीपके आणि सीजेपी नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सीजेपीच्या आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे
आंदोलक आज पुन्हा जंतर-मंतरकडे कूच करणार
दिल्लीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक झाली आहे. शनिवारी सीजेपीने दिल्लीत आंदोलन केले खरे पण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जंतर मंतरपर्यंत पोहचून दिलं नाही. सीजेपीच्या आंदोलकांनी दिल्लीतील २२ ठिकाणी घोषणाबाजी केली. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर सीजेपीने मोठी घोषणा केली.
आता या आंदोलनाचे नेृत्व अजिंक्य शिंदे करणार आहे. सीजेपीचे तिन्ही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरी देखील रविवारीही आंदोलन सुरूच राहील अशी घोषणा सीजेपीकडून करण्यात आली. ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे अजिंक्य शिंदे यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा सर्व आंदोलकांना सोडले पण अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि युट्युबर ध्रुव राठी यांना सोडले नाही. हे चौघेही अद्याप कोठडीत आहेत. हे सर्व जण पोलिसांच्या ताब्यात असले तरी देखील सीजेपीने आज सकाळी १० वाजता जंतर मंतरवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आज देखील दिल्लीमध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
महत्वाचे म्हणजे, सीजेपीच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी साथ दिली आहे. राहुल गांधी १२ ऑक्टोबरला तरुणांसोबत सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडी आणि देशातील तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि हा आवाज पहिल्यापेक्षा जास्त संपूर्ण देशभरात पसरले.
अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे. 'जिंदगी जीने के दो तरीके होते है. एक जो हो रहा है वो होने दो... बर्दाशेत करते जावो... या फिर जिम्मेदारी उठाओ... उसे बदलने की' अभिजीत दीपके यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. दरम्यान, दिल्लीतील आंदोलनानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकांवरील बंद प्रवेशद्वारे पुन्हा उघडण्यात आली आहेत. रेल्वेसेवा नियमित करण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत.
आंदोलनामुळे बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र मध्य दिल्लीतील ३० ठिकाणी वाहतूक वळवण्याची शक्यता आहे. जंतरमंतर, संसद मार्ग आणि कनॉट प्लेस परिसरावर पोलिसांचं लक्ष असणार आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. नागरिकांना प्रवासापूर्वी वाहतूक स्थिती तपासण्याचे पोलिसांनी आवाहन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.