CJP Protest: Saam Tv
देश विदेश

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

CJP Protest Update: सीजेपी नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी थेट पीएम मोदी आणि दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले. आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Priya More
  • दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर सीजेपी नेत्यांची पत्रकार परिषद

  • आशुतोष रांका यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

  • ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचे आंदोलन सुरूच राहणार

  • सौरव दास यांचे दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

  • सीजेपी नेत्यांनी आंदोलन मागे घेण्यास दिला नकार

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेसह ३ नेत्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर सोडले. त्यानंतर सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव राव यांनी पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलिस आणि मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी यावेळी आंदोलनाची पुढची दिशा देखील सांगितली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक आहेत. आम्ही मागे हटणार नाही. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे.', असा इशारा आशुतोष रांका यांनी मोदी सरकारला दिला आहे.

आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जी लढाई होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आता स्वतःवर ओढवून घेतली आहे. नरेंद्र मोदी यांना काहीही करून ज्ञानेश कुमार यांना वाचवायचे आहे अशी शपथच घेतली आहे. जगभरात देशाची प्रतिमा मलीन होत आहे. आणीबाणीबद्दल ऐकून होतो पण काल ते अनुभवनलं. रेल्वे बंद करून जनतेला त्रास दिला गेला.'

सीजेपीने आंदोलन मागे घेतले नसून ते सुरूच राहणार आहे. 'आमची लढाई ज्ञानेश कुमारांविरोधात आहे. दिल्ली पोलिसांची आम्हाला लाज वाटते. अभिजीतला आजीच्या निधनाबदद्ल पोलिसांनी सांगितले नाही. जेव्हा त्याला कळाले तेव्हा पोलिसांनी अभिजीतला नातेवाईकांसोबत बोलून दिलं नाही. निवडणूक आयोग भाजपच्या विजयासाठी काम करत आहे. ऐवढा भित्रा पंतप्रधान भारताने पाहिला नाही. पीएम मोदी डरपोक आहेत. आमची ही लढाई सुरूच राहणार आहे. खरी लढाई तर आता सुरू झाली आहे.', असे म्हणत आशुतोष रांका यांनी आंदोलन सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

सीजेपी नेते सौरव दास यांनी देखील पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सडकून टीका केली. 'आम्हाला वकिलांसोबत संपर्क करून दिला जात नाही. कोठडीत आंदोलनकर्त्यांचा छळ केला जात आहे. कायदेशीर प्रक्रिया न करता आम्हाला अटक केली गेली. विमानातून आमचं अपहरण केलं. आमचे फोन हिसकावून घेतले. आम्हाला शांततेत आंदोलन करायचे होते. दिल्लीला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. दिल्लीची सर्वबाजूने नाकेबंदी केली आहे.'

तसंच, 'आंदोलकांची डोकी फोडली जात आहेत. लोकांची गैरसोय करून आंदोलनाला बदनमा केले गेले. १९७५ नंतर देशात हुकुमशाहीचे चित्र पाहायला मिळाले. सरकार लोकांविरुद्ध युदध लढत आहे. या सरकारचा शेवट जवळ आला आहे. हे सर्व एका व्यक्तीला वाचवण्यासाठी केले जात आहे. ज्ञानेश कुमारांकडे अशी काय तुमची माहिती आहे की तुम्ही त्याला वाचवत आहे.', असे सौरभ दास म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

Weekly Horoscope: कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या आयुष्यात काय घडणार? जाणून घ्या आठवड्याचे भविष्य

Kitchen Ota Cleaning Trick : किचनचा ओटा स्वच्छ करण्याची स्मार्ट ट्रिक, तेलाचे हट्टी डाग अन् चिकटपणा चुटकीसरशी होईल गायब

SCROLL FOR NEXT