Cockroach Janta Party abhijeet deepke saam tv
देश विदेश

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या शब्दाखातर अभिजीत दीपकेंनी सोडलं उपोषण; थेट संसद मार्चमध्ये झाले सामील

Cockroach Janta Party abhijeet deepke Hunger Strike : जंतरमंतरवरील नीट परीक्षा घोटाळ्याविरोधातील आंदोलनात 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर बेमुदत उपोषण मागे घेतले.

Namdeo Kumbhar

NEET परीक्षा घोटाळा आणि शिक्षण क्षेत्रातील गोंधळाविरोधात जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आज एक मोठे वळण मिळाले आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आग्रहास्तव आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. उपोषण सोडल्यानंतर अभिजित दीपके थेट आंदोलकांसह संसदेवर काढण्यात आलेल्या मार्चमध्ये सामील झाले आहेत.

सोनम वांगचुक यांनी, "आंदोलनाची दिशा स्पष्ट असून समर्थकांनी आरोग्याची काळजी घेणे आणि मुख्य ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे," असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दिपके यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शनिवारी दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून सोनम वांगचुक यांना तब्येतीचे कारण देत जबरदस्तीने रुग्णालयात हलवले होते. या घटनेनंतर रोष व्यक्त करत अभिजीत दीपके यांनी तात्काळ बेमुदत उपोषण सुरू केले होते.

केंद्र सरकारकडून CJP ला थेट चर्चेचे निमंत्रण

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधात आक्रमक झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी 'X' वर पोस्ट करत माहिती दिली की, केंद्र सरकारने आज सकाळी स्वतः आंदोलकांशी संपर्का साधून चर्चेसाठी बोलावले आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका हे CJP च्या वतीने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. "आमच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत आणि मोठ्या संख्येने युवक आमच्यासोबत रस्त्यावर उतरले आहेत," असे सौरव दास यांनी स्पष्ट केले.

संसदेवर मार्चपूर्वी दिल्लीत कडक बंदोबस्त

CJP कडून काढण्यात येणाऱ्या 'संसद मार्च'च्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण नवी दिल्ली क्षेत्रात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या भागात 'कलम १६३' (जमावबंदी) लागू केली आहे. NEET परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, शिक्षण व्यवस्थेत मोठे सुधार व्हावेत आणि फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी CJP चे कार्यकर्ते आणि विद्यार्थी २० जूनपासून जंतरमंतरवर सातत्याने आंदोलन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या रासेगाव जवळ फर्टिलायझर कंपनीला

बीडमध्ये खळबळ! राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांचे कार्यालय जाळले; घटना सीसीटीव्हीत कैद

Parenting Tips : पालकांनो! मुलं ऐकत नाहीत म्हणून ओरडू नका, तुमच्या 'या' ५ चुका वेळीच सुधारा

Amravati Crime: कबूतर चोरीवरून २ जिवलग मित्रांची हत्या, सरपंचासह ७ जणांना अटक

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक घटना! अंगणवाडीच्या पोषण आहारात बंद पॅकेटमध्ये आढळला मृत पक्षी; पालकांचा संताप

SCROLL FOR NEXT