CISF Constable Kulwinder Kaur Post Saam TV
देश विदेश

kangana Ranaut : कंगना रणौत यांना कानशिलात लगावणाऱ्या CISF महिला जवानाच्या अडचणीत भर; विभागाकडून मोठी कारवाई

kangana Ranaut latest News : कंगना रणौत यांना कानशिलात लगावणाऱ्या CISF महिला जवानाच्या अडचणीत भर पडली आहे. CISF महिला जवानावर विभागाने मोठी कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

चंदीगढ : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या CISF महिला जवानाची बदली करण्यात आली आहे. CISF महिला जवान कुलविंदर कौरची बदली चंदीगढवरून बेंगळुरुला केली आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

सीआयएसएफ जवानाने स्पष्ट केलं की, मला निलंबित करण्यात आलं. माझ्या विरोधात तपासणी सुरु आहे'. दरम्यान, कुलविंदरने चंदीगड विमानतळावर भाजप खासदार कंगना रणौत यांना कानशिलात लगावली होती. यानंतर कुलविंदर कौरला निंलबित केलं होतं.

कानशिलात लगावल्यानंतर शेतकरी संघटनांनी कुलविंदरच्या कृत्याचं समर्थन केलं होतं. तसेच तिच्या गावातील लोकांनी तिच्यावर केलेल्या कारवाईचाही विरोध केला होता. पोलिसांनी कुलविंदरच्या विरोधात एफआयर नोंदवला होता.

बॉलिवूडमधील काही लोकांनी या घटनेचा निषेध केला होता. तर काहींनी कुलविंदरला समर्थन दिलं होतं. गायक विशाल ददलानीने कुलविंदरला पाठिंबा दिला होता. निलंबन केल्यानंतर विशालने कुलविंदरला नोकरीची ऑफर दिली होती.

सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी विनय काजला यांनी सांगितले की, कुलविंदरने माफी मागितली आहे. सुरक्षेत चूक झाली. याचा तपास सुरु झाला आहे. कानशिलात लगावणारी कुलविंदर माफी मागत आहे. मी स्वत: कंगना रणौत यांची भेट घेऊन माफी मागितली आहे. यावेळी कंगनाने कुलविंदर आणि तिच्या कुटुंबाविषयी माहिती मागितली होती'.

कानशिलात लगावल्यानंतर कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली होती. कंगना यांनी व्हिडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती. कंगना यांनी म्हटलं होतं की, 'मी सुरक्षित आहे. चंदीगढ विमानतळावर सीआयएसएफ जवानाने कानशिलात लगावली. त्यानंतर शिवीगाळ केली. तिने शेतकरी आंदोलनाची समर्थक असल्याचे तिने सांगितलं. मला चिंता वाटत आहे की, पंजाबमध्ये दहशतवाद आणि उग्रवाद वाढत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT