China’s Bone Glue: Medical Breakthrough That Heals Fractures in Just Minutes Without Surgery 
देश विदेश

Bone Glue : सर्जरी सोपी होणार, २ मिनिटात तुटलेली हाडं जोडणार, वाचा 'बोन ग्लू' कसं काम करते

Chinese scientists develop bone glue to fix broken bones in just two minutes : चीनच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिले ‘बोन ग्लू’ तयार केले आहे जे तुटलेली हाडं फक्त २-३ मिनिटांत जोडते. हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल असून ६ महिन्यांत शरीरात विरघळते. धातू इम्प्लांटची गरज नष्ट करणारा हा शोध मेडिकल क्षेत्रात क्रांती मानला जात आहे.

Namdeo Kumbhar

  • चीनच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेलं बोन ग्लू फक्त २ मिनिटांत हाडं जोडतं.

  • हे ग्लू पूर्णपणे बायोडिग्रेडेबल असून ६ महिन्यांत शरीरात विरघळतं.

  • १५० हून अधिक रुग्णांवर यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत.

  • धातू इम्प्लांटची गरज नाही, दुसरी शस्त्रक्रिया टाळली जाईल.

  • मेडिकल क्षेत्रात बोन ग्लू ही क्रांतिकारी कामगिरी मानली जाते.

Biodegradable bone glue invention eliminates need for metal implants in surgeries : चीनमधील शास्त्रज्ञांनी मेडिकल क्षेत्रात एक क्रांतिकारी शोध लावला आहे. चीनमध्ये जगातील पहिले 'बोन ग्लू' (हाडांचे चिकटवणारे पदार्थ) तयार करण्यात आले आहे. तुटलेल्या हाडांना हे बोन ग्लू फक्त २-३ मिनिटांत जोडते. हे बोन ग्लू पूर्णपणे बायोडिग्रेडेबल असून ६ महिन्यांत शरीरात विरघळते. त्यामुळे धातू इम्प्लांटची गरज संपेल आणि शस्त्रक्रियेला सोप्पी होईल. चीनच्या शास्त्रज्ञांनी १५० पेक्षा जास्त हाडांच्या रूग्णांवर या बोन ग्लूचा यशस्वी प्रयोग केला आहे.

जगभरात दरवर्षी कोट्यवधी लोक हाड तुटण्याच्या समस्येला समोरं जातात. जास्त प्रमाणात हाडं फ्रॅक्चर असेल तर सर्जरीही करावी लागते. त्यामुळे पैसे तर जाततच पण ही सर्जरी वेदनादायकही असते. शिवाय धातूचे इम्प्लांट्स लावल्याने संसर्ग किंवा दुसऱ्या शस्त्रक्रियेचा धोका असतो. बोन ग्लू ही यावर रामबाण उपाय असल्याचे चीनच्या डॉक्टरांनी सांगितलेय. बोन ग्लू हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. हाडं ठीक झाल्यानंतर ते शरीरात विरघळून जाते. चीनने आंतरराष्ट्रीय पेटेंट (PCT) साठी अर्ज केला आहे.

'बोन ग्लू' नेमकं आहे तरी काय ?

चीनमधील आघाडीच्या शास्त्रज्ञांनी 'बोन 02' नावाचा बायोमटेरियल तयार केला आहे. बोन ग्लू हाडे चिटकवण्यासाठी वापरलं जाईल. यामुळे तुटलेली हाडे फक्त दोन तीन मिनिटात जोडता येतात. समुद्राच्या पाण्यामध्ये घट्ट चिटकणाऱ्या पदार्थांपासून प्रेरणा घेऊन हा बोन ग्लू तयार करण्यात आला आहे. डॉ. लिन जियानफेंग यांनी सर्वप्रथम याबाबतचा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासात असं दिसून आले की, समुद्रातील लाटा अन् प्रवाहामध्येही सीपों अतिशय घट्ट ठेवण्याचं काम करते. रक्ताने भरलेल्या वातावरणात हाडांना चिकटवता येईल का? याबाबत रिसर्च करून बोन ग्लू तयार करण्यात आलाय.

हा ग्लू २०० kg पेक्षा जास्त वजनापर्यंत चिटकवण्याची ताकद ठेवतो. सर्जरीवेळी बोन ग्लू चा वापर केल्यास हाडे फक्त दोन ते तीन मिनिटात जोडली जाऊ शकतात. आधी सर्जरी करताना धातू इम्प्लांट करावं लागत होतं. हा धातू काढण्यासाठी दुसरी सर्जरी करावी लागत होती. पण बोन ग्लू ६ महिन्यात हाडं ठीक झाल्यानंतर स्वतःहून विरघळून जाते. दुसऱ्या सर्जरची गरज पडणार नाही.

बोन ग्लू काम कसं करतं?

सर्जरी करण्याआधी वापरला जाणारा बोन ग्लू हा एक चिकट पदार्थ आहे. रक्ताने भरलेल्या वातावरणातही बोन ग्लू मजबूतपणे चिकटतो. शास्त्रज्ञांनी ५० हून अधिक फॉर्म्युले चाचणी केली. बोन ग्लू हा शरीरासाठी सुरक्षित आहे. त्याशिवाय हाडांना बरे होण्यास मदत करते. चीनमधील वेंजोउ येथे डॉ. लिन यांच्या नेतृत्वातील डॉक्टराच्या टीमने हा बोन ग्लू तयार केला आहे.त्यांनी आतापर्यंत 150 हून अधिक रुग्णांवर यशस्वी चाचण्या केल्यात. या चाचण्या सुरक्षित आणि प्रभावी आढळल्यात. हे हाडांचे तुटणे, फ्रॅक्चर आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांमध्ये क्रांती आणणारा प्रयोग आहे. यामुळे धातू इम्प्लांट्स टाळले जातील आणि सर्जरीची वेळही कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाणा पोलीस दलातील "किशोर कुमार" हरपला..!

वंशाच्या दिव्यासाठी आईनं पोटच्या २ महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं; पाण्याच्या टाकीत बुडवलं

Maratha Reservation: १० टक्के की OBC, मराठा समाजाला कोणतं आरक्षण देणार? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

Shocking News: लिफ्टच्या दारात केस अडकले अन् डोकं चिरडलं, ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा पिंपरी चिंचवडमध्ये, पाहा डोळे दिपवणारे फोटो

SCROLL FOR NEXT