भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावरून दोन पावले मागे आले आहेत. युद्धविरामावर सहमति झाली आहे, तरीही तणाव अजूनही कायम आहे. पण पाकिस्तानचा विश्वासघाताचा इतिहास आहे. तो कधीही आपल्या शब्दापासून मागे हटू शकतो. पाकिस्तानच्या प्रत्येक दगाबाजीला भारत योग्य प्रत्युत्तर देत आहे आणि देत राहील. आता भारताला वरवर गोड बोलणाऱ्या चिनपासूनही धोका आहे. कारण चीनने युद्धजन्य परिस्थितीत पुन्हा एकदा पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. दहशतवाद्यांचा आश्रयदाता असलेल्या पाकिस्तानला अगदी उघडपणे समर्थन दिले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसहाक डार यांच्याशी बोलताना पाकिस्तानला 'आयर्न क्लॅड फ्रेंड' म्हटले. त्याचा अर्थ लोखंडासारखा मजबूत मित्र असा आहे.
पाकच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या संरक्षणाची ग्वाही चीनने दिली आहे. युद्धात पाकिस्तान एकटा नाही. त्याच्या मागे चीनचा हात आहे. चीन-पाक आर्थिक कॉरिडॉर आणि बलुचिस्तानमधील चीनी गुंतवणूक यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतरही चीनने उघडपणे पाकिस्तानची साथ दिली.
चिनचे पाकबरोबरचे हितसंबंध समोर आले आहेत. संरक्षण तज्ञांच्या मतानुसार चिनच्या आर्थिक पाठिंब्यावरच पाकिस्तान भारताच्या कुरापती काढतोय.
पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार आणि आश्रयदाते यांना भारत सोडणार नाही. पण भारताच्या या मार्गात पुन्हा एकदा चीन अडथळा बनला आहे. चीनचा पाकिस्तानला उघड पाठिंबा केवळ प्रादेशिक शांतीसाठी धोका नाही, तर भारताला दोन आघाड्यांच्या युद्धाच्या आव्हानासाठी तयार राहण्याचा संदेश देत आहे. भविष्यात भारताला एकाच वेळी नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलएसीवर सज्ज राहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.