बीजिंग - चीनमध्ये (China) कोरोना (Corona) विषाणाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं. या विषाणूपासून चीन मुक्ती मिळवत असतानाच आता चीनमध्ये बर्ड फ्ल्यू संकट ओढावत आहे. चीनमध्ये प्रथमच, मानवामध्ये H3N8 बर्ड फ्लूचा (Bird Flu) संसर्ग आढळून आला आहे. चीनच्या मध्य हेनान प्रांतातील एका ४ वर्षीय मुलाला बर्ड फ्लूच्या H3N8 या विषाणूची लागण झाली आहे अशी माहिती आरोग्य प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. असे असले तरी लोकांमध्ये त्याचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही असे देखील आरोग्य आयोगाने म्हटले आहे.
हे देखील पाहा -
चार वर्षांच्या मुलाला ताप आणि इतर लक्षणे दिसू लागल्याने संसर्ग झाल्याचे आढळून आले. परंतु त्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही व्यक्ती या विषाणूच्या विळख्यात आली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मुलगा घरात पाळण्यात आलेल्या कोंबड्या आणि कावळ्यांच्या संपर्कात होता, त्यानंतर त्याच्यामध्ये तापासह अनेक लक्षणे दिसली आणि तपासणीत त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले असं आरोग्य आयोगाने म्हटले आहे.
आरोग्य आयोगाने सांगितले की H3N8 प्रकार घोडे, कुत्रे आणि पक्ष्यांमध्ये आढळून येतो. तथापि, H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण नोंदवले गेले नाही. ही जगातील पहिली मानवी केस आहे. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तिंना बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. H3N8 स्ट्रेन हा जगातील इतर कोणत्याही देशांतील व्यक्तींमध्ये आढळलेला नाही.
H3N8 या स्ट्रेननंतर H10N3 स्ट्रेन अधिक शक्तिशाली नाही, शिवाय त्याचा धोकाही कमी आहे. आरोग्य आयोगानने सांगितले की, या विषाणूच्या स्ट्रेनमुळे फारसा धोकाही संभवत नाही. त्याशिवाय या विषाणूचा स्ट्रेन मोठ्या प्रमाणावर परसरण्याचा धोका देखील कमी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.