शेअर बाजारात पुन्हा घसरण; सेन्सेक्स 350 तर निफ्टी 127 अंकांच्या घसरणीसह सुरु

एक आठवडाभर झालेल्या सतत घसरणीनंतर काल शेअर मार्केटात तेजी दिसून आली
Share Market Latest News Updates
Share Market Latest News UpdatesSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: एक आठवडाभर झालेल्या सतत घसरणीनंतर काल शेअर मार्केटात तेजी दिसून आली होती. मात्र आजच्या दिवसाची सुरुवात परत घसरणीने सुरु झाली. सेन्सेक्स (Sensex)आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिले आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ३७२.९३ अंकांनी घसरून ५६,९८३.६८ वर सुरु झाला तर निफ्टी १२७.३४ अंकांनी घसरून १७,०७३.३५ वर सुरु झाला. निफ्टी ५० मधील केवळ ६ शेअर्समध्ये आज वाढ झाल्याचे दिसून आली तर ४४ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली आहे. (Share Market Latest News Updates)

हे देखील पाहा-

काल मंगळवारी २ दिवसांनंतर शेअर मार्केटमध्ये (Share Market) तेजी दिसून आली. सेन्सेक्स ७७६ अंकांनी वाढला, तर निफ्टी १७२०० च्या पातळीवर बंद झाला, बीएसईचे सर्व सेक्टरल इंडेक्स तेजीत होते. दुसरीकडे, निफ्टी २४६.८५ अंकांच्या अर्थात १.४६ टक्क्यांच्या वाढीसह १७,२००.८० वर बंद झाला आहे. मंगळवारी ऑटो, रियल्टी, एफएमसीजी सेक्टर्समध्ये खरेदी दिसून आली. फार्मा, पीएसई शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली आहे. मंगळवारी शेअर मार्केटमध्ये चांगले वातावरण दिसून आल्याचे मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा म्हणाल्या.

Share Market Latest News Updates
Breaking: नागपूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

निफ्टीमध्ये १७१७२ च्या पातळीवर खरेदी करायला हवी असे मत त्यांनी नोंदवले. यामध्ये १७२५० ची पातळी दिसू शकते, त्याचबरोबर १७ हजारवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. मोतीलाल ओसवालच्या शिवांगी सरडा यांनी बँक निफ्टी मध्येही खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये ३६५८५ वर खरेदी करू शकता असे त्या म्हणाल्या. पण ३६२५० वर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com