China vs India  Saam Tv
देश विदेश

China Vs India: भारताविरोधात चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

China Renames 11 Places In Arunachal Pradesh: चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे एकतर्फी बदलण्याची ही तिसरी वेळ आहे.

Shivani Tichkule

China vs India news : चीन काही केल्या कुरापती थांबवण्याच्या मनस्थितीत नसल्याचंच पाहायला मिळत आहे. चीननं आता आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या 11 ठिकाणांची नावं बदलली आहेत.

दरम्यान, चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे एकतर्फी बदलण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधीचीनने एप्रिल 2017 मध्ये सहा आणि डिसेंबर 2021 अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे बदलण्यात आली होती. (Latest Marathi News)

आता तिसऱ्या यादीत 11 ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या हालचाली भारताने याआधी फेटाळल्या आहेत. ही ठिकाणे दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे चीनचे म्हणणे आहे. भारत (India) आणि चीनमध्ये (China) दीर्घकाळापासून तणाव सुरू आहे.

5 पर्वत आणि 2 नद्यांची नावे देखील बदलली

भारताने अरुणाचलमध्ये (Arunachal Pradesh) जी-20 बैठक आयोजित केल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात चीनने हे पाऊल उचलले आहे. या G20 बैठकीत चीननेही सहभाग घेतला नाही. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशसाठी 11 ठिकाणांची प्रमाणित नावे जारी केली.

हे सर्व क्षेत्र झेंगनान (चीनच्या दक्षिणेकडील शिनजियांग प्रांताचा भाग) अंतर्गत येतात. त्यापैकी 4 निवासी क्षेत्रं आहेत. यापैकी एक भाग अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून अगदी जवळ आहे. 5 डोंगराळ भाग आणि दोन नद्या आहेत. चीननं या भागांना मंदारिन आणि तिबेटी भाषांमध्ये नावं दिली आहेत.

साखर मंत्रालयाने जारी केलेली अरुणाचल प्रदेशसाठी प्रमाणित भौगोलिक नावांची ही तिसरी यादी आहे. अरुणाचलमधील सहा ठिकाणांच्या प्रमाणित नावांची पहिली यादी 2017 मध्ये जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर 15 ठिकाणांची दुसरी यादी 2021 मध्ये जाहीर करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT