China vs India Latest Update Saam Tv
देश विदेश

China New Map : चीनच्या कुरघोड्या सुरुच, नवीन नकाशा जारी करत भारतीय भूभागावर केला दावा

India vs China : भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भागाला चीनमध्ये दाखवण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

China Released New Map :

भारताविरुद्ध चीनच्या कुरघोड्या सुरुच आहेत. चीन सरकारने नव्याने एक अधिकृत नकाशा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये भारतातील काही भाग चीनमध्ये दाखवण्यात आला आहे.

भारतातील अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन या भागाला चीनमध्ये दाखवण्यात आलं आहे. चीन सातत्याने भारताच्या भूभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यावेळी चीनने नकाशाद्वारे भारताचा काही भाग गिळला आहे.

याआधी चीनने अरुनाचल प्रदेशमधील ११ जागांची नावं बदलण्यास मंजुरी दिली होती. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, भारतच नाहीत तर तैवान आणि विविदत दक्षिण चीन समुद्र देखील चीनमध्ये दाखवला आहे. चीनने नाईल डॅश लाईनवर देखील दावा केला आहे. चीन याआधी फिलापाईन्स, मलेशिया, व्हिएतनाम, ब्रुनेई दक्षिण चीन सागरी भागावर दावा करत आला आहे.

चीनचे नॅचरल रिसोर्स मिनिस्ट्रकीचे प्रमुख वू वेनझोंग यांनी सांगितलं की, नकाशा आणि भौगोलिक माहिती राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी, सर्व स्तरांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते. नकाशे आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनास मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. (Latest Marathi News)

चीनने यावर्षी एप्रिलमध्ये 11 भारतीय ठिकाणांची नावे बदलली होती. यामध्ये पर्वत रांगा, नद्या आणि निवासी क्षेत्रांचा समावेश आहे. यापूर्वीही 2017 आणि 2021 मध्ये चीनने भारतीय ठिकाणांचे नाव बदलली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT