Corona Virus Leaked In China Laboratory: Saam Tv
देश विदेश

Corona Virus: विषाणू पसरण्यात चीनच कारणीभूत; प्रयोगशाळेतून लीक झाला होता कोरोना, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा मोठा दावा

Corona Virus Leaked In China Laboratory: जगात कोरोना पसरण्यावरून अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने चीनकडे बोट दाखवलंय. डोनाल्ड ट्रम्प येताच अमेरिकेने कोरोना महामारीवर मोठा दावा केलाय.

Bharat Jadhav

डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत येताच अमेरिकेने चीनवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. कोरोना महामारी नैसर्गिक नसून ती एका प्रयोगशाळेतून उद्भवला होता, असा दावा अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने केला आहे. याआधीही ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात कोरोनावरून चीनला टार्गेट केलं होतं. अनेकवेळा त्यांनी कोरोनाला चिनी व्हायरस म्हणत शी जिनपिंग यांच्यावर हल्लाबोल करत होते. आता परत अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने कोरोनासाठी चीनकडे बोट दाखवले आहे.

कोरोना विषाणू पसरल्याने लॉकडाऊन, आर्थिक संकट आणि लाखो मृत्यूंना कारणीभूत असलेल्या या विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक पातळीवर एक मोठा प्रश्न असल्याने गुप्तचर संघटनेचा दावा मोठा आहे. दरम्यान चीनने अमेरिकन अहवालाचे वर्णन राजकीय हेतूने करण्यात आल्याचं म्हटलंय. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) ने आपल्या अहवालात आहे की कोविड- १९ विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेतून झाली होती, ते नैसर्गिक नव्हतं.

परंतु गुप्तचर संघटनेने याबाबत कोणतेच पुरावे सादर केले नाहीयेत. बायडन प्रशासन आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या विनंतीवरून हा अहवाल तयार करण्यात आलाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या आदेशानुसार शनिवारी हे सार्वजनिक करण्यात आले.

प्रयोगशाळेतच कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली असण्याची शक्यता आहे. ते नैसर्गिक असू शकत नाही. तो विषाणू मुद्दाम प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता, असा दावा सीआयएने केलाय. दरम्यान याआधीही सीआयएकडून याबाबत अहवाल सादर करण्यात आला होता. त्या दाव्यात हा विषाणू चुकून चीनमधील प्रयोगशाळेतून पसरला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला होता असं म्हटलं होतं.

अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चिनी अधिकाऱ्यांच्या सहकार्याच्या अभावामुळे या प्रश्नांची पूर्ण उत्तरे कधीच मिळणार नाहीत. दरम्यान हा नवा निष्कर्ष कोणत्याही नवीन गुप्त माहितीच्या आधारे नाही, तर विषाणूचा प्रसार, त्याचे वैज्ञानिक गुणधर्म आणि चीनच्या विषाणू विज्ञान प्रयोगशाळांच्या स्थितीच्या नवीन विश्लेषणाद्वारे काढण्यात आलाय. दरम्यान कोरोनाचा सर्वात झळ अमेरिकेला पोहोचली होती.

या विषाणूमुळे अनेकांची मृत्यू झाला होता. येथे दररोज दोन हजार लोकांना जीव गमवावा लागला होता. ट्रम्प यांनी त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात कोरोना व्हायरसबाबत चीनवर जोरदार निशाणा साधला होता. ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या अनेकवेळा कोरोना व्हायरसला 'चायनीज व्हायरस' म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT