Satellite images reveal possible Chinese airbase and missile deployment area near Pangong Lake in Ladakh. Saam Tv
देश विदेश

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Fresh Threat for India: हिंदी चीनी भाई-भाई म्हणत भारताच्या पाठीत खंजीर खुपसणारा चीन पुन्हा एकदा दगाफटका करण्याची योजना आखतोय.. होय... शत्रूराष्ट्र चीनने लडाखमधील पेंगाँग सीमेजवळ हवाई संरक्षण तळ उभा केल्याचा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.... त्याचे सॅटेलाईट फोटो भारताच्या हाती लागलेत...

Bharat Mohalkar

हा सॅटेलाईट फोटो नीट पाहा... हा भाग आहे लडाखमधील पेंगाँग तलावाच्या पूर्वेकडचा... 2020मध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला त्या गलवान खोऱ्यापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावरचा.... या चीनच्या कागाळ्याचे फोटो इंडिया टुडे आणि अमेरिकास्थित व्हेंटॉर गुप्तचर संस्थेनं प्रसिद्ध केलेत... मात्र या फोटोत नेमकं काय आढळून आलंय?

चीनचं नियंत्रण कक्ष

लष्कराच्या बराकी

वाहनं ठेवण्याची जागा

लष्करी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम

एवढंच नाही तर या फोटोतील काही इमारतीत क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण करण्यासाठीची जागा तयार करण्यात येत असल्याचाही अंदाज वर्तवला जातोय.. तर अमेरिकन गुप्तचर संस्था 'ऑल सोर्स अॅनालिसिस'च्या अंदाजानुसार, चीन येथे HQ 9 सारखी दीर्घपल्ल्याचा मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्र तैनात केले जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे अमेरिकेने चीनसोबत टॅरिफ वॉर छेडल्यानं भारतापुढे चीननं मैत्रीचा हात पुढं केलाय..मात्र चीनकडून भारत 113 अब्ज डॉलरची आयात करतो..

त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ भारताची बाजारपेठ हातची जाऊ नये म्हणून चीन भारताला चुचकारतोय.. मात्र शांततेच्या गोष्टी करणाऱ्या याच चीन्यांनी पाकिस्तानला भारताविरोधात युद्धसाहित्य दिलं होतं.. आता अडचणीत असलेला चीन भारतासोबत शांततेच्या गोष्टी करत असला तरी सापाला दूध पाजलं तरी साप चावणं गुणधर्म सोडत नसतो, हेच भारतानं लक्षात ठेवायला हवं आणि चीनबाबत सावध भूमिका घ्यायला हवी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

SCROLL FOR NEXT