१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया Saam Tv
देश विदेश

१५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘अशी’ करा नोंदणी; जाणून घ्या प्रक्रिया

देशामध्ये १५ ते १८ वर्षे वयोगटामधील मुलांचे ३ जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : देशामध्ये १५ ते १८ वर्षे वयोगटामधील मुलांचे ३ जानेवारीपासून कोरोनाची (Corona Vaccine) लस दिली जाणार आहे. याकरिता आजपासून CoWIN अ‍ॅपवर नोंदणी (Registration) सुरु झाली आहे. यामुळे १५-१८ वयोगटामधील लसीकरणाची (Vaccination) नोंदणी आता Co-WIN वर थेट करता येणार आहे.

१ जानेवारीपासून 1१५-१८ वयोगटामधील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करु शकता. CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते १८ वयोगटातील मुले १ जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीकरिता पात्र असणार आहेत. याकरीत CoWIN पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्राकरिता १० वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे (students) आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसू शकणार आहे. यामुळे त्यांच्याकरिता ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतेच देशाला संबोधित करताना लसीकरणासंदर्भात ३ मोठ्या घोषणा केले होते. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटामधील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच १० डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस देखील (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

अशी करा नोंदणी

- पहिले Covin App वर जा.

- तेथे तुमचा मोबाइल क्रमांक टाका.

- त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करावे.

- नंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा म्हणून निवडा.

- तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा आयडी नंबर आणि नाव टाका.

- त्यानंतर लिंग आणि जन्म तारीख निवडा.

- सदस्य जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येणार.

- या रजिस्ट्रेशन प्रक्रियेकरिता CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला आहे. तिथून मुलांना लसीकरणाकरिता स्लॉट बुक करता येणार आहे.

येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. याकरिता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आले आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: जगात भारी, विराट कोहली! ODI रँकिंगमध्ये पुन्हा नंबर १, रोहित शर्माची जागा घेतली

Maharashtra Live News Update: भाजपचे "ऑपरेशन लोटस" 2.0, झेडपी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार

Gajra Hairstyles: मराठमोळा नखरा अन् केसांत माळा मोगऱ्याचा गजरा, या आहेत 5 सुंदर हेअरस्टाईल्स

Immunity Boost: आहारात या 3 पदार्थांचा करा समावेश, रोगप्रतिकारक शक्ती अन् Metabolism वाढेल; डॉक्टरांनी दिला सल्ला

Raj Thackeray: ही नवीन प्रथा कुठून आली? प्रचारासंदर्भातील आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले

SCROLL FOR NEXT