राजस्थानमध्ये आता बालविवाहाची नोंदणी केली  जाणार, भाजपने म्हटलं 'काळा कायदा'  Saam Tv News
देश विदेश

राजस्थानमध्ये आता बालविवाहाची नोंदणी केली  जाणार, भाजपने म्हटलं 'काळा कायदा'

राजस्थान विधानसभेत विवाह नोंदणी कायदा हे विधेयक मंजूर झाले असून भाजपने याला 'काळा कायदा' म्हटले आहे.

विहंग ठाकूर

राजस्थानमध्ये आता बालविवाहाची नोंदणीही केली जाईल. विवाह नोंदणी कायदा शुक्रवारी राजस्थान विधानसभेत मंजूर झाला. यामध्ये बालविवाहाची नोंदणी करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. (Child marriage will now be registered in Rajasthan, BJP says 'black law')

हे देखील पहा -

कायद्यात अशी तरतूद आहे की जे बालविवाह करतात त्यांना 30 दिवसांच्या आत त्यांच्या लग्नाची नोंदणी करावी लागेल. या वादग्रस्त विधेयकामुळे विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. भाजपने काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारवर बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. भाजपने विधानसभेत या विधेयकावर मतांचे विभाजन करण्याची मागणी केली आणि जेव्हा सरकार सहमत झाले नाही, तेव्हा भाजपने सभागृहातून वाॅक आऊट केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT