वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ऊर्जा क्षेत्रात सर्वसमावेशक सुधारणांची गरज असून विभागीय मंत्र्यांनी त्यांच्या विभागाच्या कामकाजाचा आढावा घ्यावा. यूपी (UP) सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, राज्यात अखंडित वीज पुरवठ्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देताना मुख्यमंत्री (CM) योगी म्हणाले की, "ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणांची गरज आहे. भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेऊन कृती आराखडा तयार केला पाहिजे.
हे देखील पाहा-
विभागीय मंत्र्यांनी विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन प्रत्येक स्तरावर सर्वसमावेशक बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत. ते पुढे म्हणाले की, 'ग्राहकांना योग्य वीजबिल वेळेवर मिळायला हवे. ओव्हरबिलिंग, खोटे बिलिंग किंवा उशीरा बिलिंगमुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी ऊर्जा विभागाला बिलिंगची क्षमता आणि त्याची वसुली वाढवण्यासाठी ठोस धोरण आखावे लागणार आहे. ग्रामीण भागात विशेष प्रयत्नांची गरज आहे.
कोळसा पुरवठ्यावर मुख्यमंत्री योगी काय म्हणाले?
उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमध्ये रोस्टरनुसार वीज पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जात आहे. खाणींपासून वीज केंद्रापर्यंत कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वे आणि रस्त्याचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात विजेचे संकट आहे. ऊर्जा विभागाच्या आकडेवारीनुसार, यूपीमध्ये सुमारे २३ हजार मेगावॅट विजेच्या मागणीच्या तुलनेत केवळ २०,८०० मेगावॅटचा पुरवठा होत आहे. मात्र, यूपीला राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमधून सुमारे १६०० मेगावॅट वीज मिळाली आहे. असे असतानाही अद्याप सुमारे २००० मेगावॅट विजेचा तुटवडा आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.