फ्लॉवर नहीं, फायर हूँ मैं...; जिग्नेश मेवानींचं PM मोदींना चॅलेंज

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना न्यायालयाकडून (Court) मोठा दिलासा मिळाला
Jignesh Mevani
Jignesh Mevani Saam Tv
Published On

वृत्तसंस्था: गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना न्यायालयाकडून (Court) मोठा दिलासा मिळाला आहे. आसाममधील (Assam) बारपेटा जिल्ह्यातील एका स्थानिक न्यायालयाने पोलीस (Police) मारहाण प्रकरणात मेवाणींना जामीन मंजूर मिळाल्यानंतर जिग्नेश मेवाणी यांनी सोमवारी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मेवाणी म्हणाले की, गुजरातमधील (Gujarat) निवडणुकांमुळे पीएमओच्या सांगण्यावरून आपल्याविरोधात कट रचण्यात आला होता.

हे देखील पाहा-

पुढे ते म्हणाले की, मला जामीन मिळाल्यानंतर एका महिलेवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, हा भ्याडपणा आहे. मला पकडताना दहशतवाद्याला अटक (Arrested) केल्यासारखे वातावरण निर्माण करण्यात आले होते. यावेळी मेवाणी यांनी पुष्पा स्टाईल या चित्रपटात म्हटले की, फ्लॉवर नहीं, फायर हूँ मैं...असे बोलत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Jignesh Mevani
इंटरनेट स्टार किली पॉलवर जीवघेणा हल्ला, पंतप्रधानांनी केले होते कौतुक

या हल्ल्याप्रकरणी मेवाणी यांना 25 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ट्विट प्रकरणी आसामच्या दुसर्‍या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यावर अटक केली होती. त्यांनी पुढे म्हटले की, 'माझी अटक ही साधी गोष्ट नव्हती. माझी ही अटक पीएमओ (Prime Minister's Office) मधील राजकीय नेत्यांच्या निर्देशानुसार केली गेली असावी.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com