ANDHRA GOVERNMENT TO GIVE RS 30,000 FOR THIRD CHILD AND RS 40,000 FOR FOURTH CHILD 
देश विदेश

राज्य सरकारची नवी योजना; तिसऱ्या मुलासाठी ३० हजार अन् चौथ्या अपत्यासाठी देणार ४० हजार रुपये; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Andhra Pradesh Government Launches Unique Childbirth Incentive Scheme : आंध्र प्रदेश सरकारने तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी आर्थिक मदतीची मोठी घोषणा केली आहे.लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देणे आणि कुटुंबांना आर्थिक मदत करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

Bharat Jadhav

  • तिसऱ्या अपत्यासाठी ३० हजार रुपये आणि चौथ्या अपत्यासाठी ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा.

  • ही योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केली आहे.

  • मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू सरकारने ही घोषणा केली आहे.

आंध्र प्रदेशमधील राज्य सरकारनं राज्यातील जनतेसाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे. ही योजना ऐकून तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसंख्या वाढतेय म्हणून देशातील सरकार चिंतेत पडलंय दुसरीकडे चंद्रबाबू नायडू सरकारनं चार अपत्य झालेल्यांना आर्थिक साहाय्य करण्याची योजना सुरू केली आहे. राज्य सरकार आता तिसरं अपत्य झाल्यास ३० हजार आणि चौथे बाळ झाल्यास नागरिकांना ४० हजार रुपयांची रोख आर्थिक मदत सरकार करणार आहे. (Chandrababu Naidu Government Launches Unique Childbirth Incentive Scheme)

नरसन्नपेटा येथे आयोजित 'सुवर्ण आंध्र-स्वच्छ आंध्र' कार्यक्रमात बोलताना, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील घटत्या लोकसंख्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आणि मुलांना राष्ट्राची संपत्ती म्हणून पाहिले पाहिजे, ओझे म्हणून नव्हे, असे म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार कुटुंबांना त्यांच्या तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी ३०,००० रुपये आणि चौथ्या अपत्याच्या जन्मासाठी ४०,००० रुपये देईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. "या निर्णयावर अनेकदा विचार केला आहे." आधी आपण कुटुंब नियोजनासाठी काम केले.

पण आज पुन्हा एकदा, मुले हीच आपली संपत्ती आहेत आणि आपल्या मुलांच्या सर्वोत्तम हितासाठी काम करणे आपल्या सर्वांसाठी अत्यावश्यक आहे. हीच गोष्ट तुम्हा सर्वांना सांगायची आहे. म्हणून मी आणखी एक निर्णय घेतला आहे. तो मी या महिन्यात तुम्हाला सांगत असून तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर आम्ही तात्काळ ३०,००० रुपये देऊ. चौथ्या मुलासाठी आम्ही ४०,००० रुपये देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Ireland 1st T20I: भारताचा आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव, 'या' ५ कारणामुळे सामन्यासह टीम इंडियानं गमवाली टी-२० मालिका

महसुलात 20 हजार कोटींचा घोटाळा? मुद्रांक शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला

Beijing Plane Crash: सर्वात उंच इमारतीला विमान धडकलं; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT