CEC Gyanesh Kumar Chhattisgarh Tour Postponed  AI Image
देश विदेश

Breaking News : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा २ दिवसीय दौरा अचानक रद्द; कारण आलं समोर

Election Commissioner Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा ७ आणि ८ ऑक्टोबरचा छत्तीसगड दौरा अचानक स्थगित करण्यात आला. राजीनाम्याच्या मागणीदरम्यान दौरा पुढे ढकलल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दौरा रद्द

  • ७ आणि ८ ऑक्टोबरचा छत्तीसगड दौरा स्थगित

  • दौऱ्याची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार

  • दौरा स्थगित झाल्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्याबाबतच्या चर्चांना उधाण

सध्या देशभरातून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यासाठी ठिकठिकाणी विरोधी पक्षातील नेते मंडळी तसेच CJP मार्फत आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला तरुणाईने देखील पाठिंबा दिला आहे. मात्र एकीकडे राजीनाम्यासाठी आंदोलने होत असताना दुसरीकडे ज्ञानेश कुमार यांनी आपले महत्त्वाचे काही दौरे रद्द केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर चर्चांना उधाण आले आहे. आता कुमार हे राजीनामा देणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून त्यांनी राजीनामा दिल्यास विरोधी पक्षाचा हा विजय मानला जाईल.

दौरा पुढे ढकलला

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचा छत्तीसगड दौरा अचानक स्थगित करण्यात आला आहे. हा दौरा ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित होता. मात्र, निवडणूक आयोगाने काही कारणामुळे दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दौऱ्याची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

ज्ञानेश कुमारांचा 'या' ठिकाणी होता दौरा

ज्ञानेश कुमार यांच्या या दौऱ्यात छत्तीसगडमधील काही महत्त्वाच्या धार्मिक आणि पर्यटनस्थळांना भेट देणार होते. यामध्ये दंतेवाडा येथील प्रसिद्ध दंतेश्वरी माता मंदिर, बस्तरमधील चित्रकोट जलप्रपात आणि कवर्धा जिल्ह्यातील भोरमदेव मंदिराचा समावेश होता.

राज्य अतिथीचा दर्जा

छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मंगळवारी जारी केलेल्या पत्रानुसार, ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या दौऱ्या दरम्यान राज्य अतिथीचा दर्जा देण्यात आला होता. तसेच त्यांच्या दौऱ्यासाठी आवश्यक प्रोटोकॉल आणि इतर व्यवस्थांची तयारी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, आता हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.

दौरा रद्द का केला?

हा दौरा रद्द करण्या मागे महत्त्वाचं कारण म्हणजे, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात सध्या सुरु असलेले अनेक आंदोलने. ऑक्टोबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी अनेक निर्णयांवर आक्षेप घेतला होता. तसेच त्यामध्ये नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म-6 मध्ये करण्यात आलेल्या कथित बदलाचाही समावेश आहे. यानंतर निवडणूक आयोगाच्या कामावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलने छेडण्यात आली.दरम्यान कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळघाटात रात्री भीषण अपघात

High blood pressure: औषधांशिवाय BP नियंत्रणात आणायचाय? दररोज फक्त 'या' 3 सवयी लावा

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, एका वर्षातच गाशा गुंडाळला

Graduates Election : बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी! काय आहे कारण?

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

SCROLL FOR NEXT