Chhattisgarh Vedanta Power Plant Blast  Saam Tv
देश विदेश

Shocking : कंपनीच्या बॉयलरचा स्फोट; १० कामगारांचा होरपळून मृत्यू, ४० जखमी

Chhattisgarh Vedanta Power Plant Blast News : छत्तीसगडमध्ये वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत १० कामगारांचा मृत्यू झाला असून ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप बचावकार्य सुरू आहे.

Alisha Khedekar

  • छत्तीसगडमध्ये वेदांता प्लांटमध्ये स्फोट

  • १० कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी

  • बॉयलर ट्यूब फुटल्याने अपघात

  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

  • प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी

Chhattisgarh Vedanta Power Plant 10 Dies छत्तीसगडमधून मोठी बातमी समोर आली आहे. शक्ती जिल्ह्यातील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन कंपनीतील १० जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत तीस ते चाळीस कामगार गंभीररित्या भाजले असल्याचे वृत्त समोर आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंघितराई येथील वेदांता पॉवर प्लांटमध्ये नेहमीप्रमाणे कामगार काम करत होते. काम सुरु असताना अचानक दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पॉवर प्लांटमधील बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना खर्सिया येथील पद्मावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांच्या कुटुंबीयायांनी कारखान्याबाहेर गर्दी केली असून अतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. शक्तीचे जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो हे देखील कारखान्यात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान अद्यापही अग्निशमन दल आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन करत असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT