15-Year-Old Girl Ends Life Principal Under Investigation Saam Tv News
देश विदेश

प्रिन्सिपलच्या छळाला कंटाळली; विद्यार्थिनीनं शाळेतच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'बॅड टच'

15-Year-Old Girl Ends Life Principal Under Investigation: खासगी शाळेतील १५ वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमधून मुख्याध्यापकांवर गेले गंभीर आरोप.

Bhagyashree Kamble

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. खासगी शाळेतील मुख्यध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. १५ वर्षीय विद्यार्थिनीनं शाळेतील स्टडी रूमनध्ये आयुष्य संपवलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तपासात पोलिसांना सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटमध्ये तिनं मुख्याध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही धक्कादायक घटना जशपूर जिल्ह्यातील बागीचा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली आहे. जशपूर जिल्हा पोलीस अधिक्षक शशी मोहन सिंह यांनी सांगितलं की, मुलगी १५ वर्षांची होती. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. तपासात विद्यार्थिनीच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. तिनं सुसाईड नोटद्वारे मुख्याध्यापकांवर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. सुसाईड नोटमध्ये तिनं 'बॅड टच' असं लिहिलं होतं.

या प्रकरणी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली असून, सध्या पोलिसांकडून प्रिसिंपलची कसून चौकशी सुरू आहे. विद्यार्थिनीनं आत्महत्या का केली? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाकोला पोलिसांची मोठी कारवाई, ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT