Chhattisgarh Crime News
Chhattisgarh Crime News Saam TV
देश विदेश

Crime News: नात्याला काळीमा! सरकारी नोकरीसाठी तरुणाने केलं खळबळजनक कृत्य, परिसरही हादरला

Shivani Tichkule

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पैसे आणि सरकारी नोकरीच्या लालसेपोटी आपल्या आई-वडिलांसह आजीची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

 त्यानंतर या आरोपीने दोन दिवसात हे सर्व मृतदेह सॅनिटायझर आणि लाकूडच्या मदतीने जाळून टाकले. यानंतर वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले असता घरात रक्ताचे थारोळे आढळून आले. (Latest Marathi News)

पोलिसांना (Police) घरात जळालेले मानवी अवशेषही सापडले. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे मृत चौकशी केली. चौकशीत त्याने आपणच या तिघांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महासमुंद जिल्ह्यातील सिघोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुटका गावाशी संबंधित आहे. शिक्षक प्रभात हे पत्नी सुलोचना आणि आई झरना यांच्यासह येथे राहत होते. प्रभात यांचा मुलगा उदित देखील त्यांच्यासोबत राहत होता. शिक्षकाचा (Teacher) एक मुलगा रायपूरमध्ये एमबीबीएस करत आहे. प्रभातचा मोठा मुलगा याला ड्रग्जचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. पैशासाठी आणि सरकारी नौकरीसाठी (Job) तो अनेकदा आई-वडिलांशी भांडत असे.

7 मे रोजी शिक्षकाचा मुलासोबत पैशावरून वाद झाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी शिक्षक प्रभात आणि त्यांचा मुलगा उदित यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. त्याच दिवशी उदितने वडिलांच्या हत्येचा कट रचला. घरातील सर्वजण झोपी गेल्यावर उदितने रात्री 2 ते 3 च्या दरम्यान आधी वडिलांच्या डोक्यावर हॉकी स्टिकने वार केले, त्यानंतर आई सुलोचना यांची हत्या केली. त्याचवेळी उदितच्या आजीला जाग आल्याने तिच्या डोक्यात काठीने वार करून हत्या केली

आई-वडील आणि आजीची हत्या केल्यानंतर उदितने मृतदेह घरातील बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने घरामागे लाकूड आणि सॅनिटायझर टाकून तिघांचेही मृतदेह दोन दिवस जाळले. खुनाचा आरोपी उदित याने 12 मे रोजी सिंगोडा पोलीस ठाण्यात वडील, आई आणि आजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. (Crime News)

लहान मुलगा घरी पोहोचला तेव्हा...

यानंतर शिक्षक प्रभात यांचा लहान भाऊ अमित याला आई-वडील व आजी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तो गावी आला. अमित रायपूरमध्ये एमबीबीएस करत आहे. अमित घरी पोहोचला तेव्हा घराला कुलूप होते. त्याचा भाऊ उदित कुठेतरी गेला होता.

यानंतर अमितने दुसऱ्या बाजूने घरात प्रवेश केला, तेव्हा घरात रक्ताचे लोट पडलेले दिसले आणि आवारात काहीतरी जळाल्याच्या खुणा तसेच मानवी हाडे दिसल्या. अमितला थोडी भीती वाटल्याने त्याने सिंगोडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iron Rich Foods : शरीरात रक्ताची कमतरता होतेय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Amol Kirtikar News | अमोल कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंकडून घेतला ABफॉर्म

Today's Marathi News Live : अमित शाह एडीटेड व्हिडीओ प्रकरणी एकाला अटक

Jui Gadkari Received Threat : '... नाही तर तुला जेलमध्ये टाकेन'; जुई गडकरीला तरूणीने का दिली धमकी ?

Raveena Tandon: रविनाचा दिलकश अंदाज; साडीतील खास फोटो पाहाच!

SCROLL FOR NEXT