

इम्तियाज जलील यांची धुळ्यात प्रचारसभा
जलील यांची भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका
कोट्यावधी रुपये खर्च उमेदवारांना खरेदी केल्याचा जलील यांचा आरोप
भुषण आहिरे, साम टीव्ही
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांची धुळ्यात प्रचारसभा पार पडली. यावेळी इम्तियाज जलील यांनी राज्यामध्ये भाजपचे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं की,कोट्यावधी रुपये खर्च करून उमेदवारांना कसं विकत घेतल जात, असं म्हणत भाजपतर्फे उमेदवारांना धमकावण्यात आलं. तसेच दादागिरी करून उमेदवारी मागे घेण्यास उमेदवारांना भाग पाडण्यात आलं, असा आरोप लावत हे लोकशाहीला घातक असल्याचं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
धुळे,मालेगाव,मुंब्रा,भिवंडी अशा ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. त्या ठिकाणी हेतपूर्वक नशेचा बाजार मांडला जात आहे. मुस्लिम तरुणांना नशेच्या आहारी घालवत संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे. पोलीस या नशेच्या बाजारावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा आरोप जलील यांनी राज्य सरकारवर केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला हरवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतः आलेल्या हेलिकॉप्टरमधून मोठ्या प्रमाणात पैशांच्या बॅगा छत्रपती संभाजीनगरमध्ये उतरवल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. त्याचबरोबर मला हरवण्यासाठी भाजप, सेना यांच्यासह सर्वच पक्षांनी आपण हरलो, तरी चालेल. परंतु इम्तियाज जलील निवडून आला नाही पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केल्याचा देखील केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
'मतदानाच्या एक दिवस आधी होत असलेल्या मकर संक्रांत या सणाच्या इम्तियाज जलील यांनी सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देत 14 तारखेला आपली निशाणी असलेला पतंग सर्वांनाच उडवावा लागेल, असं म्हणत एमआयएम पक्षाचा पतंग या निशाणीवर आक्षेप घेणाऱ्या शिंदे सेनाच्या मंत्र्यांवर देखील निशाणा साधला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.