Naxalites Killed in Chhattisgarh Saam TV
देश विदेश

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तब्बल ७ दहशतवाद्यांचा खात्मा, मोठा शस्त्रसाठाही जप्त

Naxalites Killed in Chhattisgarh : छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा सीमा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले.

Satish Daud

छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा सीमा भागात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांच्या जवानांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ७ नक्षलवादी ठार झाले. त्याचबरोबर या घटनेत डीआरजीचे ३ जवानही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या परिसरात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. छत्तीसगडच्या पूर्व बस्तर विभागातील एका गावात अनेक नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला घेराव घातला.

यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केला, ज्यात ७ गणवेशधारी नक्षलवादी ठार झाले. हे ऑपरेशन अनेक जिल्ह्यांच्या DRG टीम आणि ४५ व्या कॉर्प्स ITBP च्या सैनिकांनी संयुक्तपणे केले. दरम्यान, सर्व मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.

नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात वेगाने कारवाई सुरू आहे. या वर्षात आतापर्यंत राज्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत १०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत.

याआधी २३ मे रोजी नारायणपूर-विजापूर आंतरजिल्हा सीमेवरील जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीतही जवळपास ७ नक्षलवादी ठार झाले होते, तर १० मे रोजी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाने १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT