chhattisgarh News bjp leader shot dead by naxalites Shocking incident  Saam TV
देश विदेश

BJP Leader Dead: धक्कादायक! भाजप नेत्याची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या; बिजापूर परिसरात खळबळ

Chhattisgarh BJP Leader Dead: कामासाठी दुचाकीवरून बाहेरगावी निघालेल्या भाजप नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Satish Daud

Chhattisgarh BJP Leader Dead

कामासाठी दुचाकीवरून बाहेरगावी निघालेल्या भाजप नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बिजापूर शहरातील सारखेडा गावात गावात घडली. बिरजू ताराम असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

छत्तीगडमध्ये विधानसभा (Chhattisgarh) निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. मात्र, या निवडणुकीवर बहिस्कार टाका, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी परिसरातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी ही हत्या केल्याची माहिती आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, बिरजू ताराम शुक्रवारी संध्याकाळी घरी जेवण करून दुर्गा पंडालला जाण्यासाठी बाईकवरून घरातून निघाले होते. औंधी पोलीस ठाण्यापासून ४ किमी अंतरावर असलेल्या अंबागड चौकी परिसरातील सारखेडा गावात दहशतवाद्यांनी त्यांना अडवले.

दहशतवाद्यांनी बिरजू यांना मारहाण करत त्यांच्यावर गोळी झाडली. या घटनेत बिरजू यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिरजू यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, बिजापूर येथे नक्षलवाद्यांची दहशत काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बिजापूर येथील एका भाजप नेत्याची हत्या केली होती. अशीच घटना पुन्हा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगात किमान वेतन १८,००० नव्हे ३४५०० होणार

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

World Diabetes Day 2024: कमी वयातील व्यक्तींना का होतोय Diabetes? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं आणि उपाय

Maharashtra Politics : जालन्यात शरद पवारांच्या उमेदवारावर हल्ला, ताफ्यातील गाडीवर दगडफेकीचा आरोप, गुन्हा दाखल

Vande Bharat Ticket: वंदे भारत तिकीट रद्द केल्यास किती पैसे माघारी मिळणार? तिकीट बुक करण्याआधी हे नियम अवश्य वाचा

SCROLL FOR NEXT