Chhattisgarh Government Orders Transfer of Two IAS Officers in Administrative Reshuffle Saam Tv
देश विदेश

बदल्यांचा धडाका सुरूच! दोन IAS अधिकाऱ्यांची बदली

Chhattisgarh Government Transfers Two IAS Officers Before Elections: छत्तीसगड सरकारने प्रशासकीय फेरबदल करत दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. चंदन कुमार यांना राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

Omkar Sonawane

छत्तीसगड सरकारने प्रशासकीय बदल केले असून मागच्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांना बदली करण्याची एक्सप्रेस सुसाट धावत आहे. या संदर्भात सरकारने आदेश जारी केला असून 2011 च्या बॅचचे IAS अधिकारी चंदन कुमार यांना छतीसगढच्या राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी हा पदभार सोपवण्यात आला आहे.

सध्या चंदन कुमार हे छत्तीसगढमधील वित्त विभागात सचिव पदावर कार्यरत आहे. तसेच रायपूर अटल नगर विकास प्राधिकरणचे ते मुख्य कार्यपालन अधिकारीचे देखील कामकाज बघत आहे. तर दुसऱ्या आदेशात, आयएएस IAS अधिकारी तीर्थराज अग्रवाल यांना धार्मिक देणग्या आणि धार्मिक विश्वस्तव्यवस्था विभागाचा अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. ते आता केवळ त्यांच्या मूळ विभागातच काम करतील. तीर्थराज अग्रवाल सध्या छत्तीसगडच्या नियोजन, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागात उपसचिव म्हणून काम करतात आणि ही जबाबदारी ते पुढेही सांभाळतील.

आगामी काळात छत्तीसगढमध्ये निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. आसाम, पश्चिमबंगालमध्ये देखील निवडणुकीआधी प्रशासकीय विभागात बदल केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT