Chhattisgarh Naxal IED Attack : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) दलाच्या जवानांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांनी आयईडी हल्ल्यात सैनिकांनी भरलेले वाहन उडवले. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये 10 डीआरजी कर्मचारी आणि एक चालक आहे.
नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोट केला. हा आयईडी स्फोट इतका भीषण होता की रस्त्यावर अनेक फूट खोल खड्डा तयार झाला आहे. या स्फोटात जवानांचे वाहन जळून खाक झाले आहे.
याबाबत माहिती देताना बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी अरणपूरच्या पालनार भागात जवानांना लक्ष्य केले. सध्या शोध मोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरजी जवान काल ऑपरेशनवर गेले होते. परतत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल जोगा सोधी, मुन्ना राम कडती, संतोष तामो, नवीन हवालदार दुल्गो मांडवी, लखमू मरकाम, जोगा कावासी, हरिराम मांडवी, गुप्त सैनिक राजू राम करताम, जयराम पोडियम, जगदीश कावासी हे शहीद झाले आहेत. तसेच या हल्ल्यात वाहन चालक धनीराम यादव यांनाही जीव गमवावा लागला.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांत नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यात डीआरजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय अनेक नक्षलवादी नेते ज्यांनी हा मार्ग सोडला आहे, ते आता छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात डीआरजीमध्ये काम करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.