chhattisgarh news  Saam tv
देश विदेश

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

chhattisgarh news : छत्तीसगडच्या बिजापूर चकमकीची मोठी अपडेट. आतापर्यंत तीन डीआरजी जवान शहीद. तर आणखी दोन जखमी झालेत. या चकमकीत 12 माओवादी ठार झालेत.

Vishal Gangurde

छत्तीसगडच्या बिजापूर–दंतेवाडा सीमेजवळ सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये भीषण चकमक

सुरक्षा दलांकडून १२ माओवादी ठार, तीन डीआरजी जवान शहीद

सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी, जवानांवर तातडीने उपचार सुरू

गणेश शिंगाडे,साम टीव्ही

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन तासांपासून ही चकमक सुरु आहे. या चकमकीत १२ माओवादी ठार झाले आहेत. तर सुरक्षा दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत. बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली.

बिजापुरात गेल्या काही तासांपासून सुरक्षा दलाचं माओवाद्याविरोधात अभियान सुरु आहे. बीजापूर-दंतेवाड्याच्या सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं.

प्राथमिक माहितीनुसार या चकमकीत तीन सैनिक शहीद झाले आहेत. तर दोनहून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे.

नेमकी कुठे सुरु आहे चकमक?

संवेदनशील नक्षलवादी क्षेत्र मानल्या जाणाऱ्या बिजापूरच्या गंगलूर भागात ही चकमक सुरू आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सुरक्षा दलांनी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांना वेढा घातला आहे. त्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढू शकतो.

आतापर्यंत किती माओवादी ठार?

पीटीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये २०२५ सालात झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या २७५ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यातील २४६ माओवादी हे बीजापूरसहित सात जिल्ह्यात मारले गेले. तर २७ नक्षलवाद्यांचा रायपूरमध्ये खात्मा करण्यात आला. तर दुर्ग भागात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

 चकमक कुठे सुरू आहे?

छत्तीसगडच्या बिजापूर–दंतेवाडा सीमेवरील गंगलूर भागात ही चकमक सुरू आहे.

आज किती माओवादी ठार झाले?

या चकमकीत १२ माओवादी ठार झाले असून संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pan Masala: पान मसाल्याच्या पॅकेटवर होणार मोठा बदल, कंपन्यांना पॅकेजिंगबाबत सरकारचे निर्देश

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर प्रकरणी मोठी अपडेट

Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

Marathi Ukhane: लग्नात नववधुसाठी एकापेक्षा एक भन्नाट उखाणे

SCROLL FOR NEXT