गुंडांनी घेराव घातला, मित्राने पळ काढला, 40 वार करून व्यापाऱ्याची हत्या! SaamTvNews
देश विदेश

धक्कादायक : गुंडांनी घेराव घातला, मित्राने पळ काढला, 40 वार करून व्यापाऱ्याची हत्या!

लग्न समारंभातून परतत असताना मारेकर्‍यांनी व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर 40 हून अधिक वार करून ही निर्मम हत्या केलीय!

वृत्तसंस्था

बिहार : बिहार मधील सारेन जिल्ह्यातील छपरा शहरातील जाफरपूर भागात एका सोने व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकर्‍यांनी व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर 40 हून अधिक वार करून ही निर्मम हत्या (Brutal Murder) केलीय! अरुण शाह असे हत्या करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अरुण शहा यांच्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे. अरुण शाह काल रात्री एका लग्न समारंभात (Marriage Ceremony) मेजवानीसाठी गेले होते. तेथून सकाळी ते आपल्या मित्रासोबत परतत होते. याच दरम्यान काही गुंडांनी त्यांना घेरले आणि वाटेतच त्यांची निर्घृण हत्या केली. यादरम्यान त्यांचा मित्र आशिष श्रीवास्तव हा कसा तरी त्याचा जीव वाचवून घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला.

हे देखील पहा :

त्यानंतर त्याने फोनवरून या घटनेनबाबत माहिती दिल्याने नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेहाजवळ अरुण शाह यांची दुचाकी, हेल्मेट आणि बूट पडलेला होता, जो पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, मृताचा मोबाईल गायब आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेत आशिष श्रीवास्तव देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी उघडपणे काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सध्या आशिष श्रीवास्तव याला ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत.

पोलिस अनेकांची चौकशी करत असले तरी या प्रकरणात पैशांच्या व्यवहाराचा वाद चव्हाट्यावर येत असल्याचे एसपी संतोष कुमार यांनी सांगितले. घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेल्या मृत व्यक्तीच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे, तसेच त्याच्या कॉल डिटेल्सचाही शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मृत व्यक्तीला ज्या मित्रासोबत शेवटचे पाहिले होते त्याचीही चौकशी केली जात असून, त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. मात्र, पुरावे मिळाल्यानंतरच यावर सविस्तर बोलू, असे एसपी म्हणाले.

मृताचा भाऊ मंटू कुमार याने सांगितले की, माझ्या भावाचे कोणाशीही वैर नव्हते. माझा भाऊ एका मित्रासोबत शेवटच्या वेळी बाहेर गेला होता. मात्र, त्याच्या मित्राने नंतर सांगितले की काही लोकांनी त्याच्या भावावर हल्ला केला आणि जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा अरुण शाहची हत्या करण्यात आली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT