Chennai News : चेन्नई येथील नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नवविवाहित दाम्पत्य बाली येथे हनिमूनला गेलं होतं. तेथे वॉटर बाईकवर फोटोशूट दरम्यान दोघेही बुडाले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लोकेश्वरन आणि विबुष्णिया अशी मृतांची नावं आहेत. लोकेश्वरन आणि विबुष्णिया यांचं 1 जून रोजी थाटामाटात लग्न पार पडलं होतं. त्यानंतर दोघेही इंडोनेशिया येथे हनिमूनसाठी गेले होते. तेथे त्यांनी वॉटर बाईक चालवताना फोटोशूट करण्याचं प्लानिंग केलं होतं. मात्र हेच प्लानिंग त्यांच्या जीवावर बेतलं आहे.
दोघे समुद्रात वॉटर बाईक चालवत फोटोशूट करत होते. मात्र तोल गेल्याने दोघे समुद्रात पडले. काही वेळातच दोघेही समुद्राच्या पाण्यात हरवले. लोकेश्वरन यांचा मृतदेह शुक्रवारी, तर विबुष्णियाचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला. घटनेची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
विबुष्णियाच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांसह ते इंडोनेशियाला रवाला झाले. मात्र दोघांचे मृतदेह भारतात आणण्याचं मोठं आव्हान आता कुटुंबियांसमोर आहे.
कुटंबियांनी यासाठी तामीळनाडू राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मदतीसाठी विनंती केली आहे. इंडोनेशियातील भारतीय दूतावासाकडेही त्यांनी मदत मागितली आहे. (Latest Marathi News)
इंडोनेशिया ते चेन्नई थेट उड्डाण नसल्यामुळे, तामिळनाडूला परत आणण्यापूर्वी दोघांचे मृतदेह मलेशियाला नेले जातील. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगळ कोसळला आहे. नवविवाहित जोडप्याच्या अकाली सर्वांनाचा धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.