Chennai News (File Photo) Saam Tv
देश विदेश

Chennai Drown News: काळीज पिळवटून टाकणारी घटना!, बुडणाऱ्या एकाला वाचवायला गेले अन् ५ जण बुडाले

Latest Breaking News: ही घटना चेन्नईच्या नांगनल्लूर इथल्या एका मंदिरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chennai Crime News: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरनंतर आता चेन्नईमधील (Chennai) एका मंदिरामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिर परिसरामध्ये असलेल्या तलावामध्ये बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना चेन्नईच्या नांगनल्लूर इथल्या एका मंदिरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास चेन्नई पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या नांगनल्लूर येथील धर्मलिंगेश्वर या मंदिरामध्ये आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या मंदिरामध्ये पांगुनी उत्सवाचा भाग म्हणून काही भक्त विधीसाठी तलावावर जमले होते. त्याचवेळी एका मुलाचा पाय घसरुन तो तलावात पडला. हा मुलगा बुडू लागल्यामध्ये इतर चार जणांनी त्याला वाचवण्यासाठी तलावामध्ये उडी मारली. पण या मुलासोबत हे पाचही जण बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चेन्नई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दल आणि बचाव पथकाच्या कर्मचार्‍यांनी तलावात बुडालेल्या मुलांचे मृतदेह शोधून बाहेर काढले. या मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी क्रोमपेट सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यू झालेले पाचही जण चेन्नईच्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे होते. मृत्यू झालेल्या सर्वांचे वय १८ ते २३ वर्षांदरम्यान आहे.

ही घटना कशी घडली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लोकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. दरम्यान, रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये अशाच प्रकारची मोठी दुर्घटना घडली होती. बेलेश्वर शिव मंदिरामध्ये पूजेच्या वेळी विहिरीमध्ये पडून 36 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT