Viral Snakes Video Saam TV
देश विदेश

Viral Snakes Video : बापरे बाप! महिलेच्या बॅगेतून निघाले तब्बल २२ साप; घटनेचा VIDEO व्हायरल

22 Snakes Found In Chennai Airport : विविध जातीच्या सापांसह महिलेच्या बॅगेत एक मोठा सरडा देखी सापडला आहे.

Ruchika Jadhav

Chennai Airport : चेन्नई विमानतळावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे असलेल्या एका प्रवाशी महिलेच्या बॅगमध्ये चक्क साप सापडले आहेत. एक दोन नाही तर तब्बल २२ साप ही महिला आपल्या बॅगेत घेऊन फिरत होती. विविध जातीच्या सापांसह महिलेच्या बॅगेत एक मोठा सरडा देखी सापडला आहे. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली. (22 Snakes Found In Airport)

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई विमानतळावर ही घटना उघडकीस आली असून सदर महिला मलेशियातील क्वालालंपूरहून आली होती. विमानतळावर असेलल्या सुरक्षा रक्षकांनी सामानाची तपासणी करताना या महिलेची चोरी पकडली. बॅग तपासत असताना त्यात एका प्लास्टीकच्या डब्यात साप भरून ठेवले होते.

हा डब्बा पारदर्शी असल्याने बॅगेत साप असल्याचे तपासणी करणाऱ्या व्यक्तीच्या पटकन लक्षात आले. शुक्रवारी सदर घटना घडली आहे. सीमाशुल्क कायदा, 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत सीमाशुल्क विभागाने साप आणि सरडा या प्रण्यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. तसेच महिलेला देखील अटक करण्यात आली आहे.

सदर महिलेने असे का केले? हे साप घेऊन ती कोठे चालली होती याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेचा व्हिडिओ (Video) मात्र समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही वन्यजीव संरक्षक महिलेच्या बॅगेतून साप (Snake) बाहेर काढत आहेत. लागोपाठ एकएक असे तब्बल २२ साप त्यांनी बाहेर काढलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2: 'जेलर 2' च्या शेवटच्या ५ मिनिटांत मोठा ट्विस्ट! विजय सेतुपतीच्या एंट्रीमुळे तिसऱ्या भागाची रंगली चर्चा

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Namo Shetkari Yojana : दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० येणार! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Grey Colour Saree Designs For Women: नवरात्रीसाठी ग्रे कलरच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, महिलांनी नक्की ट्राय करा हे 5 पॅटर्न्स

Vijay Khairnar : मालेगावच्या चिमुकलीला अखेर न्याय! आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT