Petrol-Diesel Price  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण, ग्राहकांना दिलासा नाहीच; पेट्रोल-डिझेलचे नवीन दर तपासा

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जागतिक बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड 0.05 डॉलरने घसरून प्रति बॅरल 93.50 डॉलर पर्यंत पोहोचले. तर WTI 0.44 डॉलरने घसरून प्रति बॅरल 71.02 डॉलरने विकले जात आहे. शनिवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. इथे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत बदल होत आहेत. (Petrol Diesel Latest Price Today)

राजस्थानमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 0.48 पैशांनी वाढून 109.10 रुपये तर डिझेल 0.43 पैशांनी वाढून 94.28 रुपयांवर पोहोचले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.60 पैशांनी वाढून 103.58 रुपये आणि डिझेल 0.59 पैशांनी वाढून 96.55 रुपये इतके झाले आहे. दुसरीकडे, पंजाबमध्ये पेट्रोलची किंमत 0.30 पैशांनी घसरून 96.59 रुपयांवर पोहोचली आहे, तर येथे डिझेल 0.30 रुपयांनी स्वस्त होऊन 86.94 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.

याशिवाय महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्येही इंधनाच्या दरात काहीशी घट झाली आहे. त्याचबरोबर गुजरात, जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल-डिझेल थोडे महाग झाले आहे. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विनोद तावडेंची माहिती भाजपच्याच नेत्यानं दिली, आम्हाला काय स्वप्न पडलं? हितेंद्र ठाकूरांचा दावा

Sangli News : विना नंबरची गाडी पकडण्यावरून गोंधळ; पडळकरांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप

Vinod Tawde: विनोद तावडेंची माहिती भाजपच्या प्रमुख नेत्यानेच दिली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Lucky Zodiac Sign: बस्स! एका नजरेने घायाळ करतात या राशींच्या मुली

Uddhav Thackeray :...म्हणून तुळजा भवानीला साकडं घातलंय; विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया,VIDEO

SCROLL FOR NEXT